• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना संबधित अपडेट


गुळसुंदे : विश्वनाथ गायकवाड

कोरोंना बाधित रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे प्लाझ्मा थेरपी ही वरदान ठरणारी आहे. या प्लाझ्मा थेरपिने दिल्लीमध्ये 19 रुग्णांना बरे केल्याचे माहिती मिळाली आहे.

आज पर्यंत देशांमध्ये 21390 korona बाधित रुग्णांची संख्या झाली आहे.तर मृतांची संख्या 681इतकी झाली आहे.

राज्यात korona बाधितांचे संख्या पाच हजार 649 तर मृतांचा आकडा 251 इतका झाला आहे.

जगामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 26 लाख 39 हजाराच्या वर तर मृतांचा आकडा 1लाख 84 हजार 263 इतका झाला आहे.

या काळात जनतेला कोरोनाची माहिती देणे व सरकार बद्दलची माहिती देणे काम हे पत्रकार करत असतात. याकाळात माहिती मिळवण्यासाठी पत्रकार आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोणाची अपडेट वेळेवर देतो आहे. त्यामुळे त्यांचा अजाणतेपणे संपर्क कोरोना बाधित रुग्णांशी येत असल्याने मुंबईमध्ये 53 च्यावर पत्रकारांना कोरोना झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन दिल्ली सरकारने आपल्या राज्यांमध्ये पत्रकारांची कोरोना चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. तरी तरे सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण योग्य ते खबरदारी घेऊन बातम्या चा मागोवा घ्यावा.असे सूचित केले जात आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचा महसूल विभागाचा महसूल बुडत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की आपल्याला काही निर्णय घेऊन रेस्टॉरंट व वाईन शॉपी उघडण्यात याव्या अशी मागणी केली आहे.

राज्यामध्ये कोरोना चे हॉटस्पॉट मुंबई पुणे यांच्यापाठोपाठ मालेगाव हासुद्धा ठरला आहे. मालेगाव मध्ये आतापर्यंत शंभरच्यावर करोना बाधितांची संख्या पोहोचली आहे.

आज मालेगाव येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारांमध्ये अनेक नागरिकांनी गर्दी केल्याने सोशल दिस्टेस फज्जा उडवला. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली.परंतु काही माथेफिरूनी पोलिसांवर हल्ला केला. हे कृत्य निंदनीय आहे. पोलीस कर्मचारी लॉक डाऊन काळामध्ये जनतेसाठी 24 तास आपले कर्तव्य बजावत आहे. या काळामध्ये पोलिसांना घर जवळ असून सुद्धा घरी जाणे शक्य झालेले नाही. याचं गांभीर्य जनतेने घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

रसायनी परिसरातील मोठी बाजारपेठ मोहपाडा ही आहे. त्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत वासंबे मोहोपडा आणि चांभार्ली ग्रामपंचायत यांनी शुक्रवार 24 एप्रिल व शनिवार 25 एप्रिल रोजी जनता कर्फ्यू चे आयोजन केले आहे. या काळात या ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व किराणा दुकाने भाजीपाला आणि दुधाचे दुकाने बंद राहतील तरी सर्व नागरिकांनी घरी राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

64 views0 comments