• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना संक्रमित शहरातून येणाऱ्या गाड्यांना कर्जतमध्ये येण्यास प्रतिबंध

कोरोना संक्रमित शहरातून येणाऱ्या गाड्यांना कर्जतमध्ये येण्यास प्रतिबंध व चालक, कामगारांची स्क्रिनिंग टेस्ट करण्याची नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांची मागणी !

कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत शहरात अद्यापी कोरोना संसर्ग बाधित एकही रुग्ण आढळला नाही. मात्र त्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशाची तसेच कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून अमलात आणलेली उपाययोजना सार्थकी ठरली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून कर्जत शहरात कोरोना बाधित शहरातून येणाऱ्या माल वाहतूक करणा-या गाड्या व वाहन चालक, त्यावरील कामगार शहरात येत असल्याने कोरोनाचा फैलाव कर्जतमध्ये होऊ शकतो म्हणूनच यावर खबरदारी घेण्यासाठी माल वाहतूक करणाऱ्या चालकांची व त्यावरील कामगारांची शहरात येण्या अगोदर स्क्रिनिंग टेस्ट करणे गरजेचे असल्याची मागणी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा केतन जोशी यांनी मा. तहसीलदार, उप विभागीय पोलीस अधिकारी, व आरोग्य अधिकारी - उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्याकडे केली आहे .

लॉकडाऊन असल्याने सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतून कर्जत शहरात भाजी, अन्न धान्य व इतर वस्तूंचे माल वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो, इतर गाड्या कर्जत शहरात येत आहेत. ह्या माल वाहतूक करणाऱ्या गाड्या कोरोना संक्रमित असलेले मुंबई, नवी मुंबई, वाशी, पुणे, कल्याण, बदलापूर व इतर शहरातून येत असल्याने त्या गाड्यांचे वाहन चालक, कामगार यांच्यामार्फत कोरोना विषाणू कर्जत शहरात येऊन त्यांच्या संपर्कामुळे इतरांना कोरोना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने , हि वाहने कर्जत शहरात येण्यास प्रतिबंध करून या वाहन चालकांची तसेच गाड्यांवरील इतर कामगारांची कर्जत शहराच्या बाहेरच स्क्रिनिंग टेस्ट करून शहरात पाठविण्याची कर्जत शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मागणी कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी यांनी पत्राद्वारे केली आहे . त्यांची सदरची मागणी रास्त असून संबंधित अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

54 views0 comments