• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना व्हायरस मुळे लॉक डाऊन आणि झालेला परिणाम


विशेष वृत्त : विश्वनाथ गायकवाड     जगात कोरोना व्हायरसने हैदोस माजवला आहे. जगात आज पर्यंत जवळजवळ पंचवीस लाखाच्यावर रुग्णांना ह्या रोगाची  बाधा झाली आहे तर जगामध्ये मृत्यूचा आकडा एक लाख 77 हजार 613 इतका झाला इतका भयानक आकडा हा निश्चितच चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. अमेरिका मध्ये दर दिवसाला साधारण दोन हजाराच्या आसपास इतके लोक दररोज मृत्युमुखी पडत आहे. अमेरिका सरकार यापुढे हतबल झालेले दिसत आहे. अशीच परिस्थिती इटली फ्रान्स ब्रिटन व इतर देशांमध्ये दिसत आहे त्यामानाने भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णांची संख्या वाढण्याची वाट न बघता 22 मार्चला जनता कर्फ्यू आयोजन केले तर 23 मार्चला 144 कलम लागू केले परंतु त्याचा परिणाम जास्त न झाल्याने 24 मार्च ते तीन मे पर्यंत भारतामध्ये लॉक डाऊन जाहीर केले. त्यामुळे भारतामध्ये  रुग्णांची संख्येवर अंकुश ठेवण्यात यश मिळाले. लोक डाऊन मुळे दळणवळण बंद असल्याने अनेक उद्योगांवर त्याचा परिणाम होऊन सरकारी महसूल बुडाला तसेच राज्यातील व इतर राज्यातील मजूर कामगार अडकून पडल्याने त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी सरकारने त्यांच्यासाठी काही सुविधा करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे इतर काही मजुरांनी पायी जाण्याचा पर्याय य निवडून पायी जाण्याचे पसंत केले.      या  लॉक डाऊन परिणाम बांधकाम व्यवसायावर झाला. तसेच बऱ्याच कंपन्यांवर झाला. त्यामुळे या व्यवसायांना पूरक असे हार्डवेअर व्यवसायाचा दुकान बंद झाली इलेक्ट्रिकल पेंटिंग करण्यासाठी कलर  मिळणे बंद झाल्यामुळे मोलमजुरी करून खाणारे मजूर कामगार व पेंटर काम करणारे कामगार त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.     लॉक डाऊन chya परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्स ठेवणे अनिवार्य असल्यामुळे कोरॉना या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लोकांची गर्दी  टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेवर प्रचंड असा तणाव  निर्माण झाला. 24 तास कर्तव्य बजावत असल्याने तसेच विनाकारण  फिरणाऱ्या लोकांची चौकशी करत असताना पोलिस बांधवांचा संपर्क जवळून येत असल्याने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना बाधित होत असल्याचे दिसत आहे. एकंदर सर्व सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात याचा अनिष्ट परिणाम होताना दिसत आहे. अनेक सम्मसेला तोंड द्यावे लागणार. तो पर्यंत आपण सर्व घरातच राहून शासनाला मदत करूया.

तसेच हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे सेवा देत असताना डॉक्टर्स नर्सेस व सफाई कामगार हे रुग्णांच्या संपर्कात येत असल्याने व डॉक्टर नर्सेस यांना योग्य ते सुरक्षा किट नसल्यामुळे तेसुद्धा या कोरोना व्हायरसने बाधित होताना दिसत आहे.      कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊन चा परिणाम हा शेती व्यवसायावर पण झालेला दिसत आहे. शेतकऱ्यांनी शेतात शिकवलेला महाल भाजीपाला फळे टोमॅटो यासारख्या नाशवंत पिकांना बाजार न मिळाल्याने हवामान शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकून द्यावा लागला परिणामी शेतकऱ्यांना या सध्याच्या परिस्थितीमध्ये आर्थिक संकटाला  सामोरे जावे लागत आहे. तसेच शेती पूर्वक शेती पूरक लागणारे अवजारे बी बियाणे वेळेवर न मिळाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागला.       सर्वसामान्य कामगारांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना आपले संसार कशा रीतीने चालवायचे हा प्रश्न पडलेला आहे कारण घरामध्ये राशन व खर्चाला पैसे या दोघांचेही त्यांचाही भासत असल्यामुळे पुढे येणाऱ्या गंभीर परिस्थितीला तोंड देणे जिकिरीचे होऊन बसले आहे.


घरातच रहा, सुरक्षित रहा.🌹🌹

2 views0 comments

Recent Posts

See All

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

🎤 *_सम्राट मराठी LIVE_* 🌐 ⏩ *ब्रेकिंग न्यूज* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _*महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय.*_ https://youtu.be/122_BuNRwTA 👆🏻 *बातमी पाहण्यासाठ