• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना विषाणू बाधित दुसरा रुग्ण सापडल्याने कर्जतमध्ये प्रशासन झाले सतर्क !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत शहरातील दहिवली- संजयनगर भागात मुंबई येथून आलेल्या व्यक्तीला कोरोना झाला असतानाच आज त्याच इमारतीमधील दुसऱ्या व्यक्तीची केलेली टेस्ट कोरोना बाधित पॉझिटिव्ह निघाल्याने प्रशासन सतर्क झाले असून प्रशासनाला आत्ता योग्य उपाययोजना करण्याची गरज येऊन ठेपली आहे . यापूर्वी सापडलेला कोरोना बाधित रुग्ण हा मुंबई मध्ये सिक्युरिटी गार्डचे काम करत होता . तीन चार दिवसा पूर्वी कर्जत येथे हा रुग्ण घरी आला असता त्यास त्रास जाणवायला लागला होता , म्हणून उपजिल्हा रुग्णालयात चेकिंगला गेला असता त्याचे घेतलेले swab टेस्टिंग चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने संजयनगर परिसरात भितीचे वातावरण तयार झाले होते तर आज त्याच इमारतीत दुसरा कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने त्यास पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे .

कर्जत नगर परिषद प्रशासनाने संजयनगर मधील बिल्डिंग पूजन पॅलेस कोरोना पॉझिटिव्ह बाधित रुग्णाच्या घरातील व बिल्डींगमधील प्रत्येकाची मेडीकल तपासणी केली होती त्याचे रिपोर्ट आज समजले असता दुसऱ्या एका रहिवाश्याला कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समजले .सदरची पूजन पॅलेस इमारत व शेजारील संपूर्ण परिसर कोरोना विषाणू संसर्ग बाधित परिसर म्हणून घोषित केला असून या इमारतीतील व परिसरातील नागरिकांना बाहेर पडणे , वाहतूक करणे यावर प्रतिबंध करण्यात आले आहे .जो आदेशाची अमलबजावणी करणार नाही त्याच्यावर जिल्हा प्रशासनातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल , असे सांगण्यात आले आहे .तर दहिवली परिसरात उद्या पासून ३१ तारखेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन दहिवली परिसरातील सर्व नगरसेवकांनी केली आहे . मात्र बाहेरून आलेल्या नागरिकांना एकाच ठिकाणी कोरोन्टाईन करून ठेवल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही , अशी नागरिकांची मागणी असताना दुकाने बंद करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम प्रशासन करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे .