• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना विषाणूची चाचणी O.N.G.C च्या C.S.R फंडातून व्हावी, अशी मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांची मागणी

कोरोना विषाणूची चाचणी O.N.G.C च्या C.S.R फंडातून व्हावी, अशी मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांची मागणी

रसायनी : प्रतिक चाळके

उरण तालुक्यात कोरोना विषाणूचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून मजूर व गरीब कुटुंबांना कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्याने त्या नागरिकांना बेकारीला सामोरे जावे लागत आहे. तसेच कोरोना विषाणूचे लक्षण आढळून आल्यास त्या नागरिकांना रक्त तपासणी करण्याची वेळ येते. सरकार मान्य खाजगी रक्त तपासणी लॅब मध्ये तपासणीचा खर्च हा सुमारे ४५०० ते ५००० रुपयांपर्यंत घेतला जात असल्याने मजूर व गरीब कुटुंबातील संशयित रुग्ण हे आर्थिक परिस्थिती सलोख्याची नसल्याने कोरोना विषाणूची रक्त तपासणी करण्यासाठी टाळाटाळ करत असतात. आणि दुर्दैवाने रुग्ण हा पॉझिटिव्ह झाल्यावर त्याला जीव गमावण्याची वेळ सुद्धा येऊ शकते.

मजूर व गरीब कुटुंबातील नागरिकांवर जीव गमवण्याची वेळ येऊ नये म्हणून उरण येथील O.N.G.C च्या C.S.R फंडातून मजूर व गरीब कुटुंबातील नागरिकांची कोरोना विषाणूची रक्त तपासणी व्हावी. तसेच सदरची मदत ही आपण सरकारमान्य खाजगी रक्त तपासणी लॅबकडे थेट सुपूर्द करण्यात यावी अशी मागणी O.N.G.C च्या प्लांट हेड नरेंद्र असिजा यांच्या कडे उरण मतदार संघाचे मा.आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी लेखी पत्राद्वारे केली.