• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी रक्तदान करण्याची गरज - मा.आमदार मनोहरशेठ भोईर

मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

आंदोलन : प्रतिक चाळके

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता संपूर्ण राज्य भीतीच्या वातावरणात आहे. म्हणून सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाउन ठेवला आहे. राज्यातील मुख्यशहरांमध्ये (मुंबई, नवीमुंबई, पुणे) आदींसारख्या शहरांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना विषाणूमुळे राज्यातील स्थिती ही गंभीर होत चालली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताची गरज असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांनी एक कर्तव्य देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी आणि आपल्या समाजासाठी रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला उरण मतदार संघाचे मा.आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून महाड मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ मे व १ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

३१ मे रोजी आजिवली येथील जनता विद्या मंदिर येथे सकाळी १०.०० वाजता रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर १ जून रोजी केळवणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आपटा मराठी शाळा येथे सकाळी १०.०० वाजता तर वडघर व करंजाडे येथील जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा करंजाडे नोड सेक्टर आर -1 येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गट प्रमुख, महिला आघाडी, वाहतूक सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, माथाडी कामगार सेना, आजी माजी ग्रा.प. सदस्य कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसैनिक रक्तदाते बंधू भगिनी यांनी मोठ्या उत्साहात सोशल डिस्टन्सचे पालन व सरकारच्या नियमांचे पालन करून रक्तदान करावे असे आवाहन पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील व विभागातील पदाधिकारी यांनी केले.