• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना मुळे महाराष्ट्र दिनी झेंडावंदन नाहीचौक : अर्जुन कदम

कोरोना मुळे फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात झेंडावंदन असल्याने इतर शासकीय कार्यालयात झेंडावंदन झाले नाही.

आज ६० वा महाराष्ट्र दिन. दरवर्षी डौलाने फडकणारा ध्वज आज कोरोना मुळे फडकला नाही. ग्रामपंचायत, शाळा, पंचायत समिती, तहसील कार्यालय,पोलीस ठाणे व इतर शासकीय कार्यालयात ध्वजारोहण झाले नाही. फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री किंवा त्यांच्या अनुपस्थित जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावयाचे असल्याने इतर ठिकाणी झाले नाही.गावच्या विकासावर चर्चा करण्यासाठी आज ग्रामसभा असते,तीही चर्चा नाही, गावातील प्रभातफेरी नाही, महाराष्ट्र गीत नाही, अनेक ठिकाणी शिवजयंतीही होते, ग्रामीण भागात अनेक चांगल्या कार्यक्रमाची रेलचेल असते, भगवाध्वज घेऊन रॅली निघते, अनेक ठिकाणी महाराष्ट्र ची लोकधारा बघायला मिळते,पण या भयानक कोरोना मुळे, सोशल डिस्टन्स, घरातून बाहेर न पडणे, घरात राहून सुरक्षित रहावे या मुळे हे घडले नाही. हा कोरोना लवकरच जाऊन पुन्हा चांगले दिवस यावे अशाच शुभेच्छा अनेकजण मनातून देत होते.