• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना महामारीत मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका - जिल्हाध्यक्ष दत्ताजी मसुरकर


खोपोली : दिनेश पाटिल

               कोरोनाच्या महामारीत नागरिकांना अन्नधान्य व सँनिटायझर वाटप तसेच रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळात खा.सुनिल तटकरे,पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मदतकार्य करीत पक्षाची महत्वाची भूमिका बजावत असून याकामी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाच लाख बुथ कार्यकर्त्यांशी व्हिडिओ काँन्स्फरद्वारे संपर्क साधत केलेल्या मदतीचा आढावा घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर पत्रकार परिषदेत दिली.

     राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनाच्या सप्ताहाच्या पार्श्वभूमिवर पक्षाच्या अभिनव अभिप्राय अभियान सुरू असून यादरम्यान पक्षाने वर्धापनदिनाच्या सप्ताहात केलेल्या विविध   कार्यक्रमांची व मदतीची माहिती सर्व नागरिकांमध्ये पोहचवी या उदेश्याने रायगड जिल्हाध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर यांनी पत्रकार परिषदेत पत्रकार खोपोली आयोजित केली होती. यावेळी नगराध्यक्षा सुमन औसरमल,खोपोली शहर अध्यक्ष मनेष यादव, युवक अध्यक्ष अतुल पाटील,महिला शहर अध्यक्षा सुवर्णा मोरे,विद्यार्थी संघटना अध्यक्ष निखिल पालांडे उपस्थित होते.

     दि.१० जून रोजी पक्ष स्थापनेला २० वर्ष पूर्ण होत २१व्या वर्षात पदार्पण केले आहे या कालावधीत राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,राष्ट्रीय सरचिटणीस खा.सुनिल तटकरे,छगन भुजबळ तसेच सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी केलेल्या कार्याचा अहवाल पत्रकारांसमोर मांडवा यासाठीच पत्रकार परिषद आयोजित केलेल्या असल्याची माहिती देत कोरोनाच्या महामारीत पक्षाचे ज्येष्ठ नेते,मंत्री यांच्या आदेशाने अन्नधान्य,सँनिटाझर वाटप,डॉक्टरांनी पीपीकिट वाटपासह लोकांच्या आडीआडचणी सोडविल्या असून पक्षाच्या वर्धापनदिनाच्या सप्ताहात विविध कार्यक्रम राबवित असतानाच खोपोलीत रक्तदान शिबीर आयोजित केले असल्याचे सांगत चार वेळा राज्यात तर दोनवेळा केंद्रात सत्तेत काम करत असताना सर्वधर्म समभाव या भावनेतून पक्षाची ताकद वाढावी म्हणून अभिनव अभिप्राय सप्ताह सुरू असून केलेला कामांचा अहवाल मसुरकर यांनी मांडला.

     शेवटी पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांचे आभार युवक अध्यक्ष अतुल पाटील यांनी मानले.

™© Copyright - dont copy this text™