• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना च्या संकटामध्ये अवकाळी पावसाची भर अनेक ठिकाणी नुकसान


सायंकाळी तुरळक पावसाच्या अगमनाने निर्माण झालेले ढगाळ वातावरण 

(छाया : काशिनाथ जाधव , पाताळगंगा)


पाताळगंगा : काशिनाथ जाधव (३० एप्रिल)

कोरोना चे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्यामुळे आता अवकाळी पावसांचे संकट निर्माण होत आहे. सर्वच चिंताग्रस्त झाले आहे. एकीकडे कोरोना शी संपूर्ण प्रशासन दोन हात करीत असतांना आता अवकाळी पावसाची भर पडली आहे.सायंकाळी अचानक वातावरण बदल होवून सोसाट्याचा वारा निर्माण झाला.काही ठिकाणी घराचे नुकसान झालेचे पहावयास मिळाले. गेले दिड महिनाभर घरामध्ये असतांना हाताला काम नाही.यामुळे साहजिकच आहे.काम नाही तर दाम कोठून येणार याच चिंतेने ग्रासले असतांना या मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली.

         काल सायंकाळी ५ वाजता अचानक अकाशात बदल होवून अंधार निर्माण झाला.त्यास समवेत वादळी वारा आणी पावसाचे काही ठिकाणी मोठ्याप्रमाणावर तर काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली यामुळे तालुक्याच्या ठिकाणी घराचे नुकसान झाल्याचे पहावयास मिळाले.त्याच बरोबर काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.मात्र असे असले तरी सुद्धा या अवकाळी पावसाने अनेकांची दाणादाण उडवळी.

           या अवकाळी पावसाचा फटका सर्वात शेतकरी वर्गांस बसला असल्याचे निदर्शनास येत आहे.त्यास समवेत आंबे तसेच जंगलातील असलेला रानमेवा या अवकाळी पाऊस आणी वारा यामुळे झाडावर आलेली फळे विखुरलेली गेली असल्याच्या पहावयास मिळाली त्यास समवेत भाजी पाल्यावर यांचा मोठा फटका बसण्याची दाट शक्यता शेतकरी वर्गाकडून वर्तवली जात आहे.