• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोनाच्या लढाईत लढणाऱ्या अधिकारी यांचा सत्कार


चौक : अर्जुन कदम

वैश्विक महामारीच्या कोरोना या संसर्गजन्य विषाणू च्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र योध्दा म्हणून उभे ठाकलेल्या अधिकारी यांचा सत्कार पारले बिस्कीट या कम्पनिकडून करण्यात आला.

कोरोना या संसर्गजन्य विषाणू रोगाने जगभरात थैमान घातले आहे.त्याचा मुकाबला करण्यासाठी शासन स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू असून अनेक सेवा भावी संस्था देखील काम करीत आहेत,महसूल विभाग,पोलीस विभाग,ग्रामपंचायत,आरोग्य विभाग,नगरपालिका,स्वयंसंस्था असे अनेकजण वेगवेगळ्या माध्यमातून काम करीत आहेत,त्यांना हवी तशी सुरक्षितता  देखील नाही,तरीदेखील आपल्या परिवाराची,कामातील सहकारी,मित्र परिवार,यांच्या सहकार्याने सर्वसामान्य ते वरिष्ठ पातळीवरील सर्वांचेच एक लढवय्या सैनिक म्हणून रात्रंदिवस काम करणारे तहसीलदार, पोलीस, डॉक्टर, आरोग्यसेवा कर्मचारी, महसूल विभाग, पंचायत समिती-ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पारले परिवार  या बिस्कीट कम्पनिकडून गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.पारले  यांच्याकडून तालुक्यातील अधिकारी व त्यांना सहाय्य करणारे यांच्या गौरवाने आम्हाला एक वेगळी एनर्जी मिळाली असुन कोरोना च्या विरोधातील लढाई आणखी जोमाने लढवली जाईल,तालुक्यातील आमची टीमवर्क चांगली आहे,असे गौरव पत्र स्वीकारल्या नन्तर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी सांगून तालुक्यातुन अतिशय चांगले सहकार्य असल्याचे नमूद केले.तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी स्वच्छता,अन्नधान्य पुरवठा,परप्रांतीय यांना गावी जाण्यासाठी मदत,सॅनिटायझर,मास्क वाटप,अन्नदान,मजुरांची काळजी,मजूर महिला यांचे बाळंतपण,क्वॉरोन्टीन करणे,त्याची तयारी करणे,वादळीवारा मुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत,प्रत्यक्ष पहाणी या बाबींचा अतिशय उत्तम प्रकारे पाठपुरावा केल्याने आज खालापूर तालुका कोरोना मुक्त आहे.पोलीस उपअधीक्षक डॉ.रणजित पाटील,नायब तहसिलदार सौ.कल्याणी कदम,खोपोली वपोनी.धनाजी क्षीरसागर यांचाही गौरव करण्यात आला.


9 views0 comments