• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारले बिस्कीट कंपनीकडून रक्तदान शिबिराचे आयोजन


वावोशी : जतिन मोरे

कोरोना या संसर्गजन्य महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात रक्त कमी पडू नये म्हणून एक छोटासा हातभार म्हणून खालापूर तालुक्यातील किरखिंडी येथील पारले बिस्किट्स कंपनी आणि लिमये ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डिस्टनसिंगचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय स्वच्छतेची विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे पारले कंपनीचे मनुष्यबळ विभाग प्रमुख किशोर शेळके यांनी सांगितले.

देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत. इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना पण रक्ताची गरज असते. राज्यात दररोज साधारण पाच हजार रुग्णांना रक्ताची आवश्यकता असते. विविध शस्त्रक्रिया आणि आजारी रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते.परंतू या कोरोनामुळे नियमित चालणाऱ्या रक्तदान शिबिरांना फटका बसला आहे.शिवाय उन्हाळी सुट्टीतील अनेक मोठे रक्तदान शिबिर कोरोनामुळे अयोजितच केले गेले नाहीत. त्यामुळे राज्यात मर्यादितच रक्तसाठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील छोट्या छोट्या स्तरावर रक्तदान शिबिरांच्या आयोजनाचे आवाहन केले आहे. या आवाहनाला साथ देत सामाजिक बांधीलकीतून पारले बिस्किट्स कंपनीचे वरीष्ठ अधिकारी राजेश राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली पारले कंपनीच्या ३४ कामगारांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.