• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारले परिवाराकडून कोरोना वाँरियर्सचा सन्मानवावोशी : जतिन मोरे

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना या महाभयंकर रोगाचा संसर्ग होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केले आणि या दिवसापासून कोरोनाच्या विरोधात संपूर्ण देशाची लढाई सुरू झाली. या लढाईमध्ये शासनाच्या सूचनांचे पालन करित डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कामगार, संपुर्ण शासकीय प्रणाली कोविड योद्धा बनून नागरिकांच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावून युद्ध पातळीवर काम करीत आहेत.

या धर्तीवर रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करीत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना तयार करून त्याची ग्रामपातळीवर, नगरपालिका, महानगरपालिका आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात आली. त्यांच्या या कार्याचा अभिमान बाळगत सामाजिक बांधिलकीतून पारले कंपनीने त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर विभागातही आरोग्ययंत्रणा, स्थलांतरित मजुरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था, सॅनिटायझर आणि मास्कची व्यवस्था, अन्नधान्याची व्यवस्था असे अनेक प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळत कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी लोकांना घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रांताधिकारी वैशाली परदेशी, खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार, नायब तहसिलदार कल्याणी मोहिते-कदम, धनाजी क्षिरसागर - वरीष्ठ पोलीस निरीक्षक खोपोली पोलीस स्टेशन, विश्वजित काइंगडे - पोलीस निरीक्षक खालापूर, डॉ. रणजित पाटील - पोलीस उपअधीक्षक खालापूर, अनिल घेरडीकर - पोलीस उपअधीक्षक कर्जत, गणेश शेटे - मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी पारले कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे व्यवस्थापक किशोर शेळके, संकेत मंडावले, रवींद्र देशमुख, रंजिता ठाकूर, प्रणाली पूरी आदी कर्मचारी उपस्थित होते.