• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना चा भडका, महागाईचा तडकाप्रतिनिधी : व्ही.व्ही.जी

कोरोना विषाणूचा विळखा संपूर्ण जगाला पडला आहे. प्रत्येक देश या संकटाला सामोरे जाताना दिसत असून या रोगाला प्रतिबंध करणे म्हणजे सोशल डिस्टन्स आणि लॉक डाऊन करणे असा आहे. यामुळे आपल्या देशात लॉक डाऊन २४ मार्च पासून सुरु आहे.

त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कंपन्या वगळता सर्व कंपन्या बंद असून इतर उद्योग-धंदे सुद्धा पण बंद आहेत. अत्यावश्यक सेवेमध्ये हे किराना दुकाने सुरू असून किराणा मालासाठी लागणारा घाऊक मालाची वाहतूक करण्यासाठी ज्या ट्रकची व्यवस्था केली जाते ती लॉक डाऊन मुळे या व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या कारणामुळे घाऊक किराणामाल वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे ज्या व्यापाऱ्यांकडे किराणा माल उपलब्ध आहे ते चढ्या दराने विकताना दिसत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचा खिसा खाली होत आहे. तर एकीकडे लॉकडाऊन मुळे लोकांना काम धंदे नाही त्यात उत्पन्न सुद्धा नसल्याने सामान्य नागरिकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याने खिशाला कात्री बसत आहे. जनतेची लूट थांबवण्यासाठी संबंधित शासनाच्या विभागाने लक्ष घालून संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.

त्याचप्रमाणे सामान्य बाजारांमध्ये मिळणारा भाजीपाला हा सुद्धा लॉकडाउन काळात महाग झालेला आहे. २० रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटो साठी साधारण ४० ते ५० रुपये किलो इतके मोजावे लागत आहे. आणि इतर भाज्यांची ही अशीच परिस्थिती आहे. कारण एकीकडे नाशिक, पुणे आणि अहमदनगर या ठिकाणाहून मुंबईकडे येणारा भाजीपाला हा येत नसल्यामुळे हा भाजीपाला

शेतकऱ्याच्या शेतात पडून आहे. काही शेतकऱ्यांनी तर आपल्या तयार भाजीपाल्याच्या मालामध्ये नांगर फिरवलेला आहे. तर काहींनी उपटून फेकून दिलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तर दुसरीकडे भाजीपाला मालाचा तुटवडा असल्याने सामान्य ग्राहकांना जास्तीचे दर देऊन भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. तरी सरकारने यासंबंधी लक्ष घालून शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट ग्राहकापर्यंत कसा पोहचवता येईल आणि ग्राहकांना तसेच शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होईल याकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष घातले तर शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही याचा लाभ मिळवून महागाईवर नियंत्रण मिळवता येईल.