- हक्कासाठी आंदोलन
कोरोनाचे थैमान सुरूच

प्रतिनिधी : व्ही. व्ही. जी.
आजपर्यंत जगामध्ये 30 लाख 82 हजार कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. तर दोन लाख 12 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जगात कोरोनाबद्दल चिंतेचे वातावरण आहे.
तसेच कोरोनाच्या परिस्थितीवर भारतामध्ये लॉक डाऊन असून सुद्धा कोरोनाच्या रुग्णांमध्ये रोज वाढ होताना दिसत आहे.
देशात 29 हजार 974 किरोना बाधित यांची संख्या आहे तर 934 मृतांची संख्या आहे.
तर एकट्या मुंबईमध्ये पाच हजार 982 इतके कोरोना बाधितांची संख्या आहे.
मुंबई शहर व पुणे शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे.
नागरिकांना वेळोवेळी सूचना करूनही लोक ऐकताना दिसत नाही. विनाकारण बाहेर पडताना दिसतात. तरी लोकांनी घरी राहून प्रशासनाला मदत करून सहकार्य करावे असे आवाहन सर्व विभागातून करण्यात येत आहे.