• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळल्याने रसायनीकरांना दुसरा धक्का..

ग्रामपंचायत वावेघर हद्दीमध्ये एक तर रसायनीत आणखी एका कोरोना रुग्णाची भर


रसायनी : व्ही.व्ही.जी

22 मार्च पासून कोरोना रसायनी परिसरामध्ये चांगल्या रीतीने खबरदारी घेण्यात आली होती. परंतु रसायनीमध्ये पहिला रुग्ण शिवनगर येथे सापडला तो मुंबई येथे येऊन जाऊन नोकरी करत होता.

अशाच रीतीने वावेघर हद्दीमधील दापिवली गावातील हा तरुण सुद्धा चेंबूर येथे नोकरीसाठी रसायनी ते चेंबूर असा प्रवास करत होता. आणि याच मुंबईच्या नोकरीच्या प्रवासादरम्यान त्याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने त्याच्या संपर्कातल्या व्यक्तींना सुद्धा इंडिया बुल येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ही बाब रसायनीकरांसाठी खूप गंभीर आहे.

यासंदर्भात वावेघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलास माळी यांच्याकडे खबरदारी म्हणून घेतलेल्या उपाय योजनांची माहिती घेतली असता या पुढील तीन दिवस वावेघर गाव आणि वावेघर बाजारपेठ व दापिवली गाव संपूर्ण बंद करण्यात आलेले आहे, अशी देण्यात आली.

यामुळे आत्तापर्यंत कोरोनापासून सुरक्षित असलेली रसायनी आता काही रुग्णांमुळे कोरोना बाधीत झाली आहे.

तरी खबरदारी म्हणून सर्व नागरिकांनी स्वच्छता राखून आपले हात नेहमी साबणाने धुवावे व कोरोना पासून आपले संरक्षण करावे. कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.