• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना आणि सामजिक बांधिलकी


स्पेशल रिपोर्ट : व्ही.व्ही.जी

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत चाललेला दिसत आहे.

आज जगात 37 लाख 22 हजार 733 इतके रुग्ण आहेत. तर मृतांचा आकडा हा 2 लाख 61हजारच्यावर आहे.

देशात 52952 इतके रुग्ण तर मृतांचा आकडा हा 1783 आहे.

राज्याचा रुग्णांचा आकडा 16,698 इतका तर मृतांचा आकडा हा651 इतका आहे.

एकट्या मुंबईचा आकडा हा 10 हजारच्या वर आहे.

वरिल सर्व आकडे हे चिंताजनक आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढाई ही आपण घरात राहूनच जिंकू शकतो असे यावरुन दिसत आहे.

आज पासुन मुंबईमध्ये हार्ड वेअर चे व इलेक्ट्रॉनीक्सचे दुकाने उघडली आहेत. त्यामुळे बांधकामे आणि मोबाईल सारख्या वस्तू दुरुस्त व नविन मिळू शकतील.

लॉक डाउन हा 24 मार्च पासुन सुरु झाल्यापासून ते आत्तापर्यंत शासनाने लोकांसाठी मोफत व नेहमीचे अन्न सुरक्षा योजनेतील अन्नधान्य उपलब्ध करुन दिले.

त्याचप्रमाणे ज्या लोकांना रेशन मिळत नाही अश्या लोकांसाठी समाजातील दान शूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांनी पुढे येउन आपल्या सढळ हस्ते अन्न दान, धान्य, किराणा माल असे वाटप करुन आपले योगदान दिले. त्याबद्दल त्यांचे कौतुक व आभार त्यानी सामाजिक बांधिलकी जपली.

तर दुसरीकडे ज्या गरिबांना अन्नधान्य शासनाकडून मिळत आहे त्या धान्यवर रेशनदुकानदार काळा बाजार करतांना पकडले गेले. ही बाब निंदनीय आहे.

तसेच काही लोक विनाकारण बाहेर पडतात त्याना पुलिस आपला प्रसाद देऊन समज देऊन घरी पाठवतात.या काळात पोलिसांचे कांम वाखाणन्याजोगा आहे. पोलिस आपले कर्तव्य 24 तास पार पाडताना दिसत आहे.

तसेच डॉक्टर व नर्सेस कोरोनाला हरवण्यासाठी 24 तास कर्तव्य बजावाता ना दिसत आहे.

या सर्वामध्ये गावपातळीवर सर्व ग्रामपंचायती नी योग्य दक्षता घेउन लोक जागृती केली.

गवमधे सॅनिटायजर, मास्क आणि

गरजू व्यक्तींना अन्नधान्य व किराना मालाचे वाटप करुन कोरोना रोखण्यास मदत केली.

तेव्हा आपण सुद्धा घरातच राहुन कोरोनाला हरवूया.