• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोरोना अपडेट


विश्वनाथ गायकवाड :-

जगामध्ये कोरोना या रोगाने आपले पाय अजून मजबूत केले असून या रोगाचा प्रादुर्भाव आजपर्यंत वाढताना दिसत आहे भारतातही हा रोग जास्त प्रमाणात असताना दिसत आहे.

जगामध्ये या रोगामुळे 29 लाखाच्यावर लोकांना याची बाधा झालेले आहे. जगभरामध्ये दोन लाखाच्या वर मृत्यूंची संख्या पोहोचले आहे. भारतामध्ये 26 हजाराच्या वर लोकांना कोरोना रोगाची बाधा झाली आहे. महाराष्ट्र मध्ये सात हजार 628 लोकांना या रोगाची बाधा झालेली आहे. देशातील मृत्यूंची संख्या 719 असून राज्यांमध्ये मृतांची संख्या 323 इतकी आहे. एकट्या मुंबईमध्ये 5049 त्या लोकांना या रोगाची बाधा झाली आहे.

राज्यातील दुकाने 3 मे पर्यंत बंदच राहतील आरोग्यमंत्री राजेश जी टोपे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने परवानगी दिल्यास परप्रांतीय मजूर महाराष्ट्रामध्ये अडकलेले आहे त्यांना सोडण्याची व्यवस्था करून राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण.

देशामध्ये आणि विविध राज्यांमध्ये ज्या लोकांचे पोट हातावर आहे अशा लोकांच्या लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे.

राज्यामध्ये पोलीस खात्यातील 96 पोलिसांना कोरोनाव्हायरस बाधा झालेली आहे यामुळे काल एक पोलीस कर्मचाऱ्या चा मृत्यू झाला.

लॉक डाउन संबंधी राज्य सरकार 27 एप्रिल रोजी निर्णय घेणार.

विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर ड्रोन कॅमेरा मार्फत नजर ठेवण्यात येत आहे. तरी सर्व नागरिकांनी घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे. आणि कोरोनाला आपल्यापासून दूर करावे. असे आवाहन वेळोवेळी सरकार द्वारे करण्यात येत आहे.