• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी दुःखद घटना; रायगडचा अव्वल गोलंदाज काळाच्या पडद्याआड


रसायनी : प्रतिक चाळके

ग्रामीण आणि जिल्ह्यांतर्गत क्रिकेट च्या सामन्यांमध्ये रायगड आणि ठाणे जिल्ह्यात क्रिकेट चे सामने चुरशीचे होत असल्यामुळे हे सामने बघण्यासाठी रायगड आणि ठाणे च्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असे. त्याचप्रमाणे दोन्ही संघात उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा असल्यामुळे दोघांचे सामने बघण्यात प्रेक्षकांची मांदियाळीच होताना दिसते.

परंतु या दोन वर्षात रायगड आणि ठाणे जिल्यातील दिग्गज क्रिकेटवीर आजाराने किंवा अपघाताने मरण पावल्याचा घटना बातम्यांमध्ये दिसून येत आहेत. अशातच १० मे २०२० रोजी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला.... रायगडचा अव्वल गोलंदाज सुधीर तांडेल याचे १० मे रोजी दुःखद - निधन झाल्याची बातमी सर्वांच्या कानी पडली आणि क्रिकेट सृष्टीला मोठा धक्का बसला. सुधीर तांडेल याने कॅन्सर या आजाराशी संघर्ष करत १० मे रोजी अंतिम श्वास घेऊन संपूर्ण जगाचा निरोप घेतला. सुधीर तांडेल यांच्या कुटुंबावर तसेच रायगड क्रिकेट प्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रायगड संघासाठी गोलंदाजी करणारा सुधीर तांडेल याने आपली अव्वल गोलंदाजी दाखवत रायगड जिल्ह्यासह ठाणे जिल्ह्यात सुद्धा नाव गाजवले. सुधीर तांडेल हा रायगडच्या संघात खेळत रायगड एक्सप्रेस गोलंदाज म्हणून नावारूपाला आला.

सुधीर तांडेल याने आपली अव्वल अशी गोलंदाजी दाखवत सामनावीर व मालिकावीर म्हणून अनेक चषक पटकावले आहेत. रायगडचा एक्सप्रेस गोलंदाज कोण? तर सुधीर तांडेल याचेच नाव क्रिकेटप्रेमींच्या मुखात कायम असायचे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता क्रिकेटप्रेमींनी सुधीर तांडेल यांना घरूनच मनोभावे श्रद्धांजली वाहिली असून रायगडच्या एक्सप्रेसची गोलंदाजीची हुकूमत नसली तरी चर्चा ही होतच राहणार असे क्रिकेटप्रेमींच्या सोशल मीडियाच्या पोस्ट आणि व्हिडिओंवरून कळून येते.