• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कोयना पुनर्वसन संघाकडून मुख्यमंत्री निधीस मदत


संघाचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष व पालघर प्रतिनिधी यांनी निवासि नायब तहसिलदार यांच्याकडे धनादेश सुपूर्द करताना (छाया-अर्जुन कदम)

चौक : अर्जुन कदम

अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस निवासी नायब तहसिलदार यांच्याकडे अध्यक्ष बळीराम शिंदे व सहकारी यांनी धनादेश सुपूर्द केला.

कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे जगभर थैमान घातले असून राज्यात देखील अनेकजण मृत्यू झाले आहेत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीचे आवाहन केल्या नन्तर अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ यांनी  रायगड,ठाणे व पालघर जिल्ह्यातील कोयना प्रकल्पग्रस्त जनतेस   आवाहन केल्यावर आपल्या परिस्थिती  नुसार जमेल तेवढी मदत संघाचे अध्यक्ष बळीराम शिंदे यांच्याकडे जमा केली. ही रक्कम जमा करण्यापूर्वी कोयना प्रकल्पग्रस्त जनतेने विविध मंडळे,संस्था व वैक्तिक मदतही दिली आहे.निवासी नायब तहसिलदार तवटे यांच्याकडे रक्कम रुपये ५१,०००/-चा धनादेश (एक्कावन्न हजार मात्र) अध्यक्ष बळीराम शिंदे,कार्याध्यक्ष किसन जाधव,प्रभाकर मोरे व निवृत्ती शेलार यांनी सुपूर्द केला.
34 views0 comments