• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कुंभीवली आदिवासीवाडीतील कंटेन्मेंट झोन मधील आदिवासी बंधवांच्या मदतीसाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार


खोपोली : दिनेश पाटील

कुंभीवली ग्रामपंचायत हद्दितिल आदिवासी वाडीत कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने सील केलेल्या आदिवासी वाडीतिल आदिवासी बांधवांसाठी ग्रामपंचायत सरसावली असून वाडीत औषध फवारणीसह अन्नधान्याचा पुरवठा करीत कंटेंमेंट झोन उठे पर्यंत कुंभीवली ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी उभी राहिल असे आश्वासन दिले आहे.

खालापुर तालुक्यातील कुंभिवली आदिवासीवाङीतील  अठरा वर्षीय तरूणाचा   शवविच्छेदनाचा अहवालात तो कोरोना बाधित असल्याचे उघङ झाल्याने खालापूरवर पुन्हा कोरोनाची वक्रदृष्टी पडली असून खबरदारीचा उपाय म्हणून कुंभिवलीवाडी सील करण्यात आली आहे.वाडीतील अठरा वर्षीय तरूणाने अकरा मे रोजी पुलावरून द्रूतगती मार्गावर उङी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.त्याला जखमी अवस्थेत खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले होते.परंतु तो गंभीर जखमी असल्यामुळे त्याला उपचारासाठी रूग्णवाहिकेतून उपचारासाठी जे जे रूग्णालय मुंबई येथे हलविण्यात आले. त्याठिकाणी दोन दिवसाच्या  उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.अपघाती मृत्यू असल्यामुळे शवविच्छेदन केले असता मृत तरूणाला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली.त्यामुले कुंभिवली आदिवासी वाडी सील करण्यात आली असून मृत तरूणाच्या संपर्कात आलेले ङाॅक्टर,रूग्णवाहिका चालक यांना काॅरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

यावेळी कॉरंटाइन केलेल्या कुंभिवली आदिवासी वाडीत ग्रामपंचायतिच्या वतीने सेनिटायझर फवारणी केली असून कॉरंटाइन केलेल्या घरांमध्ये सेनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे तसेच चौदा दिवस पुरेल इतके धान्य देण्यात आले असून पुढील चौदा दिवसात त्यांची कोणतीही अड़चन होणार नाही याकडे ग्रामपंचायतिचे बारीक लक्ष असून कॉरंटाइन झोन उठे पर्यंत कुंभिवली ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल असे आश्वासन ग्रामपंचायतिचे उपसरपंच रूपचंद पोलेकर यांनी दिले आहे.

81 views0 comments