• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; १७ मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउन

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला :- केंद्र सरकारचा मोठा निर्णय

रसायनी : रोशन कांबळे

मुंबई कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात १७ मे पर्यंत लोकडॉऊन वाढवण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने एक पत्रक जारी केले आहे. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारने केली आहे. सर्व राज्यांमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती आणि त्याची समीक्षा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

४ मे पासून पुढील २ आठवडे हा लॉकडाउन असणार आहे. हा लॉकडाउन लागू करताना ग्रीन झोन व ऑरेंज झोनसाठी गृह मंत्रालयाने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. तसेच या लॉकडाउन दरम्यान रेड झोन मधील भागांना कोणत्याही सवलती देणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.