• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

केदारनाथ ग्रामविकास व क्रीडा मंडळ यांनी मुख्यमंत्री निधी बरोबर गरजूंची केली भोजनाची व्यवस्था

केदारनाथ ग्रामविकास व क्रीडा मंडळ यांनी मुख्यमंत्री निधी बरोबर गरजूंची केली भोजनाची 🍱 व्यवस्था


चौक : अर्जुन कदम🔖

कोरोना या संसर्गजन्य विषाणू मुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोविड-१९ मुळे जगभरात हाहाकार माजला आहे. हे संकट महाराष्ट्र राज्यात देखील आहे,या कठीण परिस्थितीत शासनाने मदतीची अपेक्षा केली आहे,तसे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे.या संकटाचा सामना करण्यासाठी केदारनाथ ग्रामविकास मंडळ व केदारनाथ क्रीडा मंडळ कोयना-वेळे (घोट कॅम्प) यांजकडून एक लाख दहा हजाराची मदत निवासी नायब तहसिलदार दत्ता आदमाणे यांच्याकडे केदारनाथ ग्रामविकास चे अध्यक्ष सुनील कदम व केदारनाथ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दीपक कदम यांनी सुपूर्द केली आहे.

कोयना वेळे (घोट कॅम्प) हा परिसर औद्योगिक वसाहती च्या जवळपास आहे. या ठिकाणी अनेक रोजनदारीवर काम करणारे परप्रांतीय व स्थानिक मजूर देखील आहेत.

काम करणारे स्थानिक व परप्रांतीय मजूर यांना भोजनाची देखील सोय केली आहे. हे गाव कोयना प्रकल्पग्रस्त आहे. शासनाला केलेल्या योगदानासाठी निवासी नायब तहसिलदार श्री. आदमाने यांनी कौतुक करून शासनाला केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले. रमेश कदम, रवींद्र कदम, प्रकाश कदम, प्रवीण कदम व संतोष कदम यांनी विशेष मेहनत घेतली आहे..