• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जत येथे कोरोना विषाणू टेस्टिंग लॅबचे जि. प. उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते उदघाटन !

उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे कोरोना विषाणू टेस्टिंग लॅबचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या हस्ते उदघाटन !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे - कोरोना विषाणू संसर्ग महामारीचा खऱ्या अर्थाने काळ आता पाहण्यास मिळत आहे. सध्या रायगड जिल्ह्यात अनेक तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. अदितीताई तटकरे यांच्या पुढाकारातुन सर्वत्र खबरदारी घेण्यात येत असून बाधित रुग्ण त्वरित समजण्यासाठी कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड १९ (कोरोना विषाणु) Swab Testing Lab चे उदघाटन मा. श्री सुधाकरशेट घारे (उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण, आरोग्य व क्रीडा राजिप) यांच्या हस्ते करण्यात आले. संपूर्ण रायगड जिल्ह्यामधे मा . नामदार आदितीताई तटकरे (पालकमंत्री, रायगड) यांच्या पुढाकारातुन कोविड १९ (कोरोना विषाणू ) Swab Testing Lab सुरु करण्यात आल्या आहे, आज दि. १५ मे २०२० रोजी कर्जत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे मा. सुधाकरशेट घारे (उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण, आरोग्य व क्रीडा राजिप) यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कर्जत तालुक्यात एखादा संशयीत रुग्ण आढळला की त्याचे Swab घेण्यासाठी पनवेल किंवा मुंबई येथे रुग्णास घेवुन जावे लागत होते परंतु आता कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे Swab घेतले जाणार आहेत, यामुळे कर्जत तालुक्यातील नागरिकांना त्वरित बाधित रुग्णांचे निदान समजणार असून उपचार चालू होण्यास याचा फायदा होणार आहे . याप्रसंगी राजिप चे उपाध्यक्ष तथा शिक्षण - आरोग्य सभापती सुधाकरशेट घारे , बालाजी पूरी (गटविकास अधिकारी कर्जत पंचायत समिती ), डॉ बनसोडे (MS सर्जन - कर्जत उपजिल्हा रुग्णालय अधिकारी), डॉ . पाटील, कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान विरोधी पक्षनेते शरदभाऊ लाड व इतर मान्यवर उपस्थित होते