• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जत - नेरळ पोलीस ठाण्याच्या मागे कोरोनाचा ससेमिरा , सुरक्षा उपायांची गरज !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

जनता कर्फ्यू ते लॉकडाऊन असा अडीच महिन्याच्या कालावधीत पोलीस यंत्रणा धिटाईने नागरिकांची सुरक्षा करत असताना अहोरात्र झटत होती , मात्र त्यावेळेस कर्जत तालुक्यात कुठल्याच पोलिसांना कोराना झाला नसताना आता मात्र त्यांना कोरोनाच्या ससेमिरास सामोरे जावे लागत असल्याने त्यांना सुरक्षा उपायांची गरज असल्याचे दिसून येत आहे .

लॉकडाऊन शिथिल झाल्याने कर्जत तालुक्याच्या सर्व भागात कोरोनाचा संसर्ग पोहचला आहे . तालुक्यात भांडण तंट्याच्या केसेस होत असल्याने पोलिसांना त्यांचे कर्तव्य पार पाडताना आरोपींना इच्छितस्थळी जाऊन पकडून आणावे लागते . आरोपी अनेकांच्या संपर्कात असल्याने त्याला कोरोना संसर्ग झाला असल्याची शक्यता असते . मात्र अशा आरोपीस पकडायला जाताना पोलिसांकडे कुठलेच कोरोना विषाणू संसर्ग सुरक्षा कवच नसल्याने पोलीस अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झाल्याचे चित्र सध्या कर्जतमध्ये दिसत आहेत . त्यामुळे पोलिसांच्या मागे कोरोना लागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पोलीस कोठडीमधील आरोपीमुळे कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी, कोरोनाग्रस्त आहेत , तर एका पोलिसाची पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाली असून आता त्यात कर्जत पोलीस ठाण्यातील आणखी एका पोलीस कर्मचारी यांची वाढ झाली आहे. तसेच नेरळ पोलीस ठाण्यात देखील एका आरोपीमुळे पोलीस उपनिरीक्षक यांना कोरोना ची लागण झाली आहे.त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस उपनिरीक्षक यांच्या संपर्कात आलेल्या अनेक पोलिसांना कोरोन्टाइन करण्यात आले आहे.त्यामुळे पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे , मात्र त्यांच्याकडे पीपीई किट सारखी सुरक्षा कवच असल्यास त्यांची कोरोना विषाणूपासून सुरक्षा होऊ शकते व हीच उपाययोजना काळाची गरज आहे , अन्यथा संपूर्ण पोलीस ठाणे कोरोना विषाणू बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही . म्हणून आरोपीला पकडायला जाताना पीपीई किट घालून व पुढील कार्यवाही करेपर्यंत हे सुरक्षा कवच कोरोनापासून पोलिसांचे रक्षण करू शकते .