• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जत नगर परिषदेने स्वीट मार्टच्या दुकानातील माल तपासणी करण्याची गरज !कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

राज्य शासनाने तिसऱ्या टप्प्यात कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या काळात संचारबंदी व लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली असल्याने नागरिक दैनंदिन व गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत . या ५० दिवसाच्या काळात मनाजोगे खाद्य पदार्थ खाऊ शकले नसल्याने बंद असणाऱ्या मिठाई दुकांनांमुळे अनेक मिठाई शौकिनांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवला होता , मात्र लॉकडाऊन नियमांत शिथिलता आली असल्याने कर्जतमध्ये स्वीट मार्ट ची दुकाने आता उघडली जाणार आहेत .त्यामुळे या दुकानातील खाद्य पदार्थ नागरिकांच्या आरोग्यास लाभदायक आहेत कि हानिकारक याची तपासणी होणे गरजेचे झाले आहे .

कर्जत नगर परिषद हद्दीत पालिका प्रशासन , व्यापारी वर्ग , व इतर सर्व शासकीय अधिका-यांच्या झालेल्या बैठकीनुसार कर्जत बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची नियमावली बनविली आहे . जोपर्यंत संचारबंदी व लॉकडाऊन आहे तोवर दिलेल्या तारखेनुसार दुकाने उघडी रहाणार आहेत. कर्जमधील स्वीट मार्ट, व इतर खाद्य पदार्थांची दुकाने लॉकडाऊन काळात जवळजवळ ५० दिवस बंद होती , त्यामुळे ह्या अगोदरची सर्व मिठाई खराब झाली आहे , तसेच इतर हि खाण्याचे पदार्थ खाण्यास योग्य राहिले नाहीत , असे पदार्थ ग्राहकास विकल्यास ते खाण्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो . त्यामुळे तालुक्यासह कर्जत शहरातील सर्व मिठाई दुकाने , स्वीट मार्ट व इतर खाद्य पदार्थांच्या दुकानातील सर्व वस्तू तपासणी करण्याची गरज आहे .

जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभाग व कर्जत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने स्वीट मार्ट मधील मिठाई कधी बनविली ,माल फ्रेश आहे कि नाही , खाद्य पदार्थ खाण्या योग्य आहेत का , त्यांची एक्सपायरी डेट संपली आहे काय , दुकानात स्वच्छता आहे काय , आदी नागरिकांच्या आरोग्यासंबंधी बाबी तपासण्याची गरज आहे . त्यातच कोरोना विषाणू संसर्ग महामारीचा हा काळ असल्याने खबरदारी घेणे , गरजेचे आहे .