• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जत नगर परिषदेच्या फवारणीमुळे कोरोना विषाणू महामारीत नागरिकांना दिलासा !


कर्जत नगर परिषदेच्या फवारणीमुळे कोरोना विषाणू महामारीत नागरिकांना दिलासा !कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे व कोरोना महामारीच्या काळात झालेल्या मच्छर वाढीचा नागरिकांच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होऊ नये , म्हणून कर्जत नगर परिषद प्रत्येक प्रभागात कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या काळापासून आजपर्यंत औषध फवारणी सातत्याने करत आहे . आत्ता पुन्हा आपल्या परिसरात फवारणीला सुरुवात होणार असल्याचे कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ . सुवर्णा केतन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कर्जतकरांना कळविले आहे .

कोरोना विषाणू संसर्ग महामारीचा हा काळ असल्याने वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशानेच औषध फवारणी करावी लागते . जादा फवारणी करणे हे नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते .पालिकेने नवीन आणलेल्या मशिनने मच्छर औषध फवारणी व धूर फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे . या गाडीत एकदा औषध आणि पाणी भरल्यानंतर तीन तास चालते , म्हणजे एका दिवसाला एक प्रभाग होणे शक्य नसल्याने आरोग्य विभाग गाडी व्यतिरिक्त हात पंपाने फवारणी करण्याचेही नियोजन केले आहे . दिवसभरात सहा तास फवारणी केली जाणार आहे .

दिनांक २३ गुरुवार- प्रभाग क्रमांक ७ , दिनांक २४ - शुक्रवार- प्रभाग क्रमांक ९ ,दिनांक २५ -शनिवार -प्रभाग क्रमांक ६ , दिनांक २६ -रविवार- प्रभाग क्रमांक ४ ,दिनांक २७ -सोमवार -प्रभाग क्रमांक १ , दिनांक २८ - मंगळवार- प्रभाग क्रमांक ५ , दिनांक ३० -गुरुवार- प्रभाग क्रमांक ८, अशी प्रभागवर आखणी केली आहे . आलेल्या संकटावर मात करायची आहे . सगळे नागरिक आपलेच आहेत आणि त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे ,तरी त्या - त्या प्रभागातील लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती सौ. सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष कर्जत नगरपरिषद यांनी केली आहे .

113 views0 comments