• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जत - खालापूर तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा

कर्जत - खालापूर तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा ; आमदार महेंद्र थोरवे यांचे तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश
खोपोली : शिवाजी जाधव

देशासह राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड-१९)रोगाचा संकट वाढत असून रायगड जिल्ह्यात कर्जत- खालापूर तालुक्यामध्ये चक्रीवादलासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून आजून एक संकट ओढवले आहे. कर्जत- खालापूर तालुक्यातील परिसरात चक्रीवादळसह अवकाळी पावसाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हजेरी लावली असून बऱ्याच नागरिकांचे नुकसान झाले आहे.


कोरोना रोगामुळे सर्वत्र ठिकाणी लॉक डाउन असल्याने सर्वसामान्य माणसांचे रोजगार सुद्धा थांबले असून अशा आणीबाणीच्या काळात ह्या अवकाळी चक्रीवादळ पावसामुळे शेतकरी, आणि गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ह्या चक्रीवादळ पावसामध्ये घरांचे छप्पर, पत्रे, शेड उडून गेल्याने कर्जत- खालापूर तालुक्यातील नुकसान झालेल्या नागरिकांवर संकट ओढावले आहे.


कर्जत- खालापूर तालुक्यात अवकाळी चक्रीवादळ पावसाने ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे अश्या ठिकाणी कर्जत- खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोली शिवसेना शहर प्रमुख सुनील पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते हरीश काळे यांनी भेट देऊन योग्य ती शहानिशा करून तहसीलदार यांना पंचनामे करण्यास सांगितले.