• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जत कॉम्पटेक कॉम्प्युटर एज्युकेशन मार्फत छोट्या व्यापा-यांना कोरोना सुरक्षा कवच वाटप !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कोरोना विषाणू संसर्ग महामारी तोंड , नाक , कान सुरक्षित ठेवल्यास कोरोना विषाणू आपल्या शरीरात शिरकाव करू शकत नाहीत याचा परिपूर्ण अभ्यास करून संपूर्ण चेहरा सुरक्षित राहण्यासाठी कॉम्पटेक कॉम्पुटर एज्युकेशन कर्जत या संस्थेचे सर्वेसर्वा जितेंद्र माळी सर यांनी कर्जतमधील छोट्या व्यापाऱ्याना कोरोना सुरक्षा कवच वाटप करून सामाजिक बांधिलकीची जाण ठेवली.

गरीब - गरजूवंत नागरिक छोट्या दुकानंदारांकडे वस्तू खरेदी करण्यासाठी येतात . दिवसभरातून हजाराच्या संख्येने आल्यावर या छोट्या दुकानदारांची कोरोनापासून सुरक्षा होणे गरजेचे आहे . जर अशा दुकानदारांनी आपली काळजी घेतली नाही , तर कोरोना विषाणू झडप टाकण्यास तयार असतात , हि परिस्थिती पुढे जाऊन भयावक होऊ नये म्हणून नेहमीच मदतीचा हात देऊन शिक्षण क्षेत्रातील कॉम्पुटरचे ज्ञान देणारे व भावी पिढी घडविण्यात अग्रेसर असणारे कर्जत मधील कॉम्पटेक कॉम्पुटर एज्यूकेशनचे सर्वेसर्वा जिंतेन्द्र माळी सर आणि त्यांची पत्नी संचालक प्रिया माळी यांनी कोरोना विषाणू संसर्ग होण्यापासून छोट्या व्यापा-यांबरोबरच नागरिकांची सुरक्षा व्हावी या उदात्त धोरणाने व सामाजिक बांधिलकी जोपासत कोराना विषाणू सुरक्षा कवच वाटप कर्जतमध्ये केले . हे आगळे - वेगळे चेहरा झाकणारे सुरक्षा कवच गाडीवर प्रवास करताना , बाजारातून खरेदी करताना , गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची सुरक्षा करण्यास उपयुक्त ठरणार आहेत .