• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित व्यक्तीस ऍडमिट केल्याने नर्स ला देखील झाली लागण !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

घर वापसी मुळे कर्जत शहरात आलेल्या बाहेरच्या नागरिकांना कोराना विषाणू ची लागण लागली असून आज या संख्येत वाढ होऊन शहरात पाच तर माथेरानमध्ये एक असे सहा जणांचे कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले . मात्र कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाहेरून आलेल्या नागरिकांस तपासणी करून तेथेच बेकायदेशीर ऍडमिट करून घेतल्याने त्यांच्या संपर्कात परिचारिका ( नर्स ) आल्याने त्यांनाही कोरोनाची लागण लागल्याचे स्पष्ट झाले. उपजिल्हा रुग्णालयात कुठल्याही रुग्णास ऍडमिट करून घेतले जात नसताना ठाण्यावरून आलेल्या त्या व्हीआयपी रुग्णास रुग्णालयात ऍडमिट कुणाच्या सांगण्यावरून करून घेतले, याचा खुलासा कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला करावा लागणार आहे. आणि त्यामुळेच तेथील नर्स ला हि लागण झाल्याची चर्चा सध्या कर्जतमध्ये होत आहे .

कर्जत शहरातील गुंडगे रोड येथील मंगलमूर्ती इमारतीतील मुंबईवरून आलेल्या व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह झाला होता, तर त्याच्या कुटुंबातील पत्नी व एक मुलगा, मुलगी यांचे हि रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले. तर ठाणे येथून आलेल्या व्यक्तीला धर्ती ग्रुप इमारतीतील त्याच्या घरातील लोकांनी मेडिकल चेकअप करण्यास उपजिल्हा रुग्णालयात पाठविले होते ,त्या व्यक्तीला त्रास होत असल्याने त्याचे योग्य swab घेऊन त्यास घरी पाठवून जोवर रिपोर्ट येत नाही तोवर होम कोरोन्टाईन करणे हा इलाज असताना त्या रुग्णास उपजिल्हा रुग्णालयात बेकायदेशीरपणे ऍडमिट करून घेतले, या व्हीआयपी व्यक्तीला कुणाच्या सांगण्यावरून ऍडमिट केले, याची चर्चा त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर व त्यांच्या सानिध्यात एका सिस्टर ( नर्स ) ला कोरोनाची लागण झाल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली. बेजबाबदार डॉक्टरांनी घेतलेल्या निर्णयामुळे उपजिल्हा रुग्णालयात शिरलेला हा विषारी कोरोना विषाणू अजून कुणाकुणाला पॉझिटिव्ह करतो , किती जणांची साखळी वाढवितो, हे येणारा काळच ठरवेल .मात्र तूर्ततरी प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुढे आला असून कोरोनाची साखळी कर्जतकरांच्या मानेभोवती घट्ट होत चालली असल्याचे चित्र येथे दिसत आहे.