• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जतमध्ये दोन डॉक्टर पॉझिटिव्ह!

कोरोना बाधित व्यक्तीस ऍडमिट केल्याने उपजिल्हा रुग्णालय ठरणार " डेंजरस झोन ", दोन डॉक्टर पॉझिटिव्ह !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाहेरून आलेल्या नागरिकांस तपासणी करून तेथेच बेकायदेशीर ऍडमिट करून घेतल्याने त्यांच्या संपर्कात नर्स आल्याने दोन दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची लागण लागल्याचे स्पष्ट झाले होते .उपजिल्हा रुग्णालयात कुठल्याही रुग्णास ऍडमिट करून घेतले जात नसताना ठाण्यावरून आलेल्या त्या व्हीआयपी रुग्णास रुग्णालयात ऍडमिट कुणाच्या सांगण्यावरून करून घेतले , याचा तपास लागण्यापूर्वीच आज तेथील दोन डॉक्टरांना कोरोना विषाणूने जखडले असून डॉक्टरांमुळे अजून किती जणांना हा विषारी कोरोना विषाणू पॉझिटिव्ह करतो , याची चिंता कर्जकरांना लागली आहे , त्यामुळे सध्या उपजिल्हा रुग्णालय कोरोनासाठी " डेंजरस झोन " म्हणून सिद्ध होत असल्याचे चित्र आहे .

कर्जत शहरातील गुंडगे रोड येथील मंगलमूर्ती इमारतीतील मुंबईवरून आलेल्या व्यक्तीच्या घरातील बायको मुलांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्या लगोलग दुसऱ्या दिवशीच धर्ती ग्रुप इमारतीतील ठाणे येथून आलेल्या व उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या त्या व्यक्तीला त्रास होत असल्याने त्याचे योग्य swab घेऊन त्यास घरी पाठवून जोवर रिपोर्ट येत नाही तोवर होम कोरोन्टाईन करणे असे आदेश असताना त्या रुग्णास उपजिल्हा रुग्णालयात बेकायदेशीरपणे ऍडमिट करून घेतले , या व्हीआयपी व्यक्तीला कोरोना पॉझिटिव्ह त्याच्या शरीरात असल्याने त्यांच्या सानिध्यात एका सिस्टर ( नर्स ) ला कोरोनाची लागण झाली . बेजबाबदार डॉक्टरांनी घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयात शिरलेला हा विषारी कोरोना विषाणू अजून कुणाकुणाला पॉझिटिव्ह करतो , किती जणांची साखळी वाढवितो , याची चिंता असतानाच आज तेथील दोन डॉक्टरांना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे समोर आले .

आरोग्य प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे या दोन डॉक्टरांनी ओपीडीसाठी आलेल्या किती रुग्णांना तपासले असून याची लागण अजून कुणाकुणाला लागते , तसेच त्या डॉक्टरांच्या कुटुंबापैकी कोण कोरोना बाधित झालेत का ? हा आता संशोधनाचा विषय आहे . उपजिल्हा रुग्णालय त्यामुळे " डेंजरस झोन " होऊन कोरोनाची साखळी यामुळे नक्कीच वाढणार व कर्जतकरांच्या मानेभोवती कोरोना विषाणू पिसाटलेल्या भुतासारखा बसणार , असेच एकंदरीत चित्र येथे दिसत आहे .