• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जतमध्ये चिनी मालावर बंदी आणण्याची संघटनेची मागणी !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे -

भारत देशाच्या सीमेवर गलवाण खोऱ्यात चीन व भारताच्या सैनिकांत झालेल्या चकमकीत भारताचे वीस जवान शहीद झाले , याचे पडसाद सर्वत्र पसरले असून चीन विरोधात नागरिकांत संताप खदखदत असून राज्यात विकल्या जाणाऱ्या चिनी मालावर बंदी आणण्याची मागणी जोर धरू लागली असून कर्जतमध्येही चिनी मालावर निर्बंध आणावे , अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे .

पहिले कोरोना विषाणू संसर्ग केल्याचे चीनने सिद्ध झाले असल्याने या महामारीने देशाबरोबरच राज्यातही हाहाकार उडाला असतानाच देशाच्या सीमेवर गलवाण खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यात वीस सैनिक शहिद झाले . त्यामुळे चीनचा माल भारत देशाबरोबरच राज्यात हि बंद करण्याची संतप्त मागणी जोर धरू लागली . कर्जतमध्येही छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने हि मागणी केली आहे . चिनी माल खरेदी विक्री होत असल्याने चीन आर्थिक दृष्टया सक्षम होत आहे . खेळणी , शोभेच्या वस्तू , मोबाईल , लोखंड , इलेक्ट्रॉनिक , इलेक्ट्रिक वस्तू ,चायनीज खाद्य अशा प्रकारच्या अनेक चिनी वस्तूं नागरिकांचा वापरण्यावर भर आहे . यावस्तु न घेतल्यास त्याचा चीनला आर्थिक नुकसान होईल , म्हणून या वस्तू खरेदीवर बहिष्कार टाकून चीनचे आर्थिक कंबरडे मोडू शकतो . त्याचप्रमाणे सोशल मीडियावर असणारे पबजी गेम , टिक - टॉक , यामुळे देखील करोडो रुपये चीन देशाला मिळतात , हे गेम बंद केले पाहिजेत .

कर्जत तालुक्यात देखील चिनी मालाने बाजारपेठ सजल्या असल्याने नागरिकांनी या वस्तू खरेदी करू नये , अशी मागणी छत्रपती शिवाजी राजे तक्रार निवारण संघटनेने केली आहे .