• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जतमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत शहरातील दहिवली- संजयनगर भागात आज मुंबई येथून आलेल्या व्यक्तीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे , सदर माहिती कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. बनसोडे यांनी दिली असता उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा आणि कर्जत नगरपरिषद प्रशासन त्या भागात पोहचली आहे. सदर पेशंट मुंबई मधे सिक्युरिटी गार्डच काम करत होता. तीन चार दिवसा पूर्वी कर्जत येथे हा रुग्ण घरी आला असता त्यास त्रास जाणवायला लागला म्हणून लगेच उपजिल्हा रुग्णालयात चेकिंगला गेला होता . दोन दिवसापूर्वी त्याचे कोरोना विषाणू swab टेस्टिंगसाठी घेतले होते. आणि आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने संजयनगर परिसरात भितीचे वातावरण तयार झाले . तर बाधित रुग्णास पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

कर्जत नगर परिषद प्रशासनाने संजयनगर मधील बिल्डिंग पूजन पॅलेसमध्ये संपूर्ण बिल्डींग सॅनिटराईझ करायला घेतली असून कोरोना पॉझिटिव्ह बाधित रुग्णाच्या घरातील व बिल्डींगमधील प्रत्येकाची मेडीकल तपासणी केली असून त्यासर्वांचे रिपोर्ट २२ मे रोजी समजणार आहेत . या पूजन पॅलेस इमारतीच्या शेजारील संपूर्ण परिसर कोरोना विषाणू संसर्ग बाधित परिसर म्हणून घोषित केला असून या इमारतीतील व परिसरातील नागरिकांना बाहेर पडणे , वाहतूक करणे यावर प्रतिबंध करण्यात आले आहे .जो आदेशाची अमलबजावणी करणार नाही त्याच्यावर जिल्हा प्रशासनातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात येईल , असे सांगण्यात आले आहे. मात्र बाहेरून आलेल्या नागरिकांना एकाच ठिकाणी कोरोन्टाईन करून ठेवल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही , अशी नागरिकांत चर्चा होत आहे .