• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

कर्जतकरांच्या सुरक्षेसाठी कोवीड थ्रोट टेस्ट मशीन हलविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत तालुक्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे . अशा रुग्णांची तपासणी कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील कोवीड थ्रोट मशीनद्वारे करण्यात येते . हि मशीन कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात असल्यामुळे कोरोना बाधित पेशंट हा प्रथम बाजारात येत असतो , त्याचा परिणाम थेट कर्जत शहरातील जनतेवर होतो आणि त्यामुळे ससंर्ग वाढत असुन, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता थ्रोट मशीन रायगड हॉस्पिटल, डिकसळ येथे हलविण्यात यावी , अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे केली आहे .

कर्जत शहराच्या बाहेर कोरोना विषाणू तपासणी केल्यास पेशंट बाहेरच्या बाहेर तपासणी करून जाऊ शकतो आणि सामान्य माणूस सरकारी दवाखान्यात सर्प चावलेले , अपघात तसेच साथीचे इतर आजार , महिला वर्ग प्रसूतीसाठी उपचार करण्यासाठी येत असतात .कोरोना तपासणीसाठी येणारे रुग्णांच्या सानिध्यात उपजिल्हा रुग्णालयात येणारे ईतर रुग्ण येण्याची दाट शक्यता आहे.आणि तसं काही घडल्यास कोरोना बाधितांची संख्या वाढून उपजिल्हा रुग्णालयच सिल करावे लागेल अशी भितीजनक परिस्थिती उद्भवल्यास अशा परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांनी जायचं कुठे ? लॉकडाऊन, त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती व खाजगी दवाखाने बंद असतात त्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीबांना सरकारी दवाखाना एकमेव आधार आहे . असे तक्रार निवेदन वंचित बहुजन आघाडी कर्जत यांनी दिले असून याबाबत त्वरित दखल घेऊन कोविड थ्रोट टेस्टची मशिन उपजिल्हा रुग्णालय येथून हलवून रायगड हॉस्पीटल डिकसळ येथे न्यावी अशी मागणी करण्यात आली आहे .

सदरचे निवेदन मा.जिल्हाधिकारी

अलिबाग-रायगड , मा.उपविभागीय अधिकारी - कर्जत , मा.जिल्हा शल्यचिकीत्सक - अलिबाग-रायगड , मा.आमदार महेंद्रशेट थोरवे - कर्जत विधानसभा , मा.वैदयकीय अधिक्षक - कर्जत , मा.मुख्याधिकारी - कर्जत नगरपरिषद , कर्जत , मा.नगराध्यक्षा सुवर्णा जोशी - कर्जत नगरपरिषद , कर्जत यांना अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी धर्मेंद्र मोरे, प्रदीप ढोले, राहुल गायकवाड, सुनिल वाघमारे तसेच ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संबंधित अधिकारी यांना दिले आहे .सदरची मागणी कर्जतकरांच्या दृष्टीने महत्वाची असून यामुळे कोरोना संसर्गापासून नागरिकांची सुरक्षा होऊ शकते .

6 views0 comments
™© Copyright - dont copy this text™