• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

ओंमकार भोईर यांनी कलिंगड कापून केला वाढ दिवस साजरा


वाढ दिवसाला होणारा खर्च टाळून गरीबांना करणार मदत


तळोजा : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील कोलवडी या गावातील इयत्ता दहावी मध्ये शिकणारा ओंमकार भोईर या मुलांने आपला 16 वा वाढ दिवस धूमधडाक्यात साजरा न करता तसेच केक कापून न करता चक्क कलिंगड कापून आपला वाढ दिवस साजरा केला. तसेच वाढ दिवसाला होणारा खच॔ टाळून तो पैसा कोरोनामध्ये ज्या लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांच्यासाठी खच॔ करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या संपूर्ण जगाला कोरोनो सारख्या महाभयंकर विषाणूने ग्रासलेले आहे. आपल्या देशावर आणि महाराष्ट्रावर मोठे संकट ओडवले आहे. आपली जनता सध्या संकटात सापडलेली , जनता दुखी असताना आपण आपला वाढ दिवस थाटामाटात साजरा करू शकत नाही. सध्या शरीराला केक महत्वाचा नाही तर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी फळे किती महत्त्वाची आहेत . हा संदेश लोकांपर्यंत पोचविण्यासाठी कलिंगड कापून वाढ दिवस साजरा केला. तसेच वाढ दिवसाला जो खच॔ केला जाणार होता तो खच॔ मी खरीबा लोकांना धान्य वाटण्यासाठी वापरणार असल्याचे ओंमकार भोईर याचे वडील संतोष भोईर यांनी म्हटले आहे. सध्या कोणीच आपला वाढ दिवस थाटामाटात साजरा न करता तो वाढ दिवसाला येणारा खच॔ खरीब जनतेच्या सेवेत लावावा असे आव्हान ओंमकार भोईर यांनी केला आहे.

यावेळी यावेळी या काय॔क्रमाला पडघे गावचे युवा समाजसेवक कल्पेश कांबळे, निरज सिंग, संतोष भोईर, स्वरूप भोईर उपस्थित होते.

27 views0 comments