• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

एच.आय.एल मधील आणखी एकाला कोरोनाची लागण


रसायनी : प्रतिनिधी

वासांबे मोहोपाडा परिसरात कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. त्याचबरोबरच रसायनी पाताळगंगा परिसरातील भारत सरकार चा उपक्रम असणारी कंपनी हिल इंडिया लिमिटेड मधील आणखी एका कामगाराला त्याच्या घरीच कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मागील आठवड्यात सुद्धा या कंपनीत एका कामगाराचा अहवाल पॉसिटीव्ह आला होता.

वासांबे मोहोपाडा परिसरात या आठवडाभरात

कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला असून मोहोपाडा परिसरातील एका डाॅक्टरला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. दिनांक २७ जुन च्या संध्याकाळपर्यंत वासांबे मोहोपाडा हद्दीत तीन नव्याने कोरोना रुग्ण सापडले. यामुळे नागरीकांमध्ये भयावह चर्चेचा विषय बनला आहे. तसेच डाॅक्टरच्या संपर्कात असलेले रुग्णही भयभीत झाले आहेत.

शनिवार दिनांक उशिराच्या अहवालानुसार पुढील आकडेवारी सादर करण्यात आली आहे.

आत्तापर्यंतचा एकूण अहवाल

रिस २, गणेशनगर ३, कांबा १, रीसवाडी १, मोहोपाडा - पोसरी ३, भटवाडी १ एकूण = ११ शासनाच्या विविध सूचनांचे पालन नागरिकांकडून न केल्याने पुन्हा वासांबे मोहोपाडा परिसरावर कोरोनाचे संकट कोसळले आहे. यासाठी आवश्यक गोष्टींसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

™© Copyright - dont copy this text™