• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

एक हात समाजसेवेसाठीरसायनी : प्रतिनिधी

नुकताच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रसायनीतील चांभार्ली गावावरील बसथांबा स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका वरील निवारा शेड तुफान वादळी वाऱ्यामुळे व जोरदार पावसामुळे उडून गेला व बरेच दिवस त्याची बिकट अवस्था झाली होती ,महाराजांचे स्मारक पावसामध्ये भिजत होत सर्वांचेच दुर्लक्ष होतं होत यातूनच एक सामाजिक संदेश म्हणून एक हात समाजसेवेसाठी या सामाजिक उपक्रमासाठी रसायनीतील युवकांनी पुन्हा एकदा शिवभक्त असल्याचा अभिमान बाळगत चांभार्ली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक वरील निवारा शेड नविन करून व सभोवतालचा परिसराचे सुशोभीकरण तसेच रंगरंगोटी करून चांगलं सामाजिक काम करून दाखवल आहे यावेळी केदार शिंदे, अजित पाटील, पंकज जाधव ,नरेंद्र पाटील, रोशन ठोंबरे, जगदीश कोंडीलकर, सुशांत पाटील, शुभम बाबर, प्रथमेश गायकवाड, लखन जाधव, ऋतिक पाटील, निशांत घुसाळकर इत्यादी युवक उपस्थित होते. यापुढेही आम्ही असेच समाजकार्य करू ही ग्वाही दिली आहे.