- हक्कासाठी आंदोलन
एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची केली मदत
कोरोनाच्या संकटात सांजगाव ग्रामपंचायत नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी....
एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची केली मदत

खोपोली -
कोरोना विषाणूच्या प्रार्दुभाव पसरू यासाठी संपूर्ण देशात टाळोबंद असल्याने उद्योगधंदे बंदमुळे अनेकांच्या हात काम गेल्याने सर्वसामान्य कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली असल्याने सांजगाव ग्रामपंचायत सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत हद्दीतील एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आडचणीच्या काळात ग्रामपंचायत आपल्या सोबत असल्याचे भावनिक आवाहन केले आहे.
खालापूर तालुक्यातील सांजगाव ग्रामपंचायतीत मोठी औद्योगीक वसाहत असून यापरिसरात मोठ्या प्रमाणत लोकवस्ती असल्याने कोरोनाचा संक्रमण होवू नये यासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य नरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अजित जाधव, उपसरपंच नितीन पाटील, ज्येष्ठ सदस्य अजित देशमुख, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे आणि अन्य सदस्य संकटाच्या या काळात प्रचंड मेहनत घेत आहेत. धूर फवारणी, औषध फवारणी, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केल्यानंतर साजगाव, ढेकू आणि सारसन या तीनही गावातील एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सारसन येथील ग्रामस्थांना जिल्हा परिषदेच्या शाळेत संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू पोटे, ग्रामपंचायत सदस्य अजित देशमुख,सारिका कर्णुक, ग्रामविकास अधिकारी रश्मी शिंदे,ज्योतिष संजय खोपे यांच्या हस्ते जिवणावश्यक वस्तू किरणा सामानाचे वाटप करण्यात आले.
तर सांजगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर युध्दपातळीव काम सुरू असल्याने त्यांच्या कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.
प्रतिक्रिया
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कुटुंबांना एक लिटर सॅनिटायझर देण्याचा व आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
अजित देशमुख (सदस्य - ग्रामपंचायत सांजगाव)