• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

उरण विधानसभा मतदारसंघात २१हजार गोरगरिब कुटुंबांना जिवनावश्यक वस्तू वाटपाचा संकल्प

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्याकडून चौक विभागात ७०० गरजू कुटुंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप, तालुक्यात ७४००कुटूंबांनी घेतला लाभ


उरण विधानसभा मतदारसंघात २१हजार गोरगरिब कुटुंबांना जिवनावश्यक वस्तू वाटपाचा संकल्परसायनी : राकेश खराडे

सध्या देशात कोरोना(कोविड १९) या विषाणुने हाहाकार घातल्याने सर्वंत्र गंभीर परिस्थिती आहे.कोरोनाच्या या जैविक युध्दात हातावर पोट भरणा-या गरजू गोरगरीब व शेतकरी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुले त्यांना पुरेसे अन्न मिलेनासे झाले आहे.यातच लाॅकडाऊनची सूची वाढतच चालल्याने हातावर पोट असणाऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करून

जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मनोहर भोईर सामाजिक संस्थेच्यावतीने चौक जिल्हा परिषद विभागातील गरजू व गोरगरिब कुंटूंबांना धान्यासह किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. वाटपप्रसंगी जि.प सदस्य मोतिराम ठोंबरे उपस्थित होते. यावेळी चौक विभागातील वरोसे, वरोसेवाडी, नढाळ, चौक नवीन वसाहत, चौक बौद्ध वाडा, चौक गाव वावंढल, वावंढळवाडी, टेम्पो चालक मालक संघटना चौक, वावंढळ बौद्धवाडा येथे राहणाऱ्या ७०० गरीब कुटूंबियांना मोफत तांदूळ, डाळ, तेल, साखर, कांदे आदी जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टिंक्शनचे काटेकोर पालन करण्यात आल्याचे दिसून आले. माजी आमदार मनोहर भोईर यांनी नागरिकांना लाॅकडाऊन कालात घरात राहण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर देशमुख,माजी उपसरपंच सुहास कदम,माजी उपसरपंच सचिन मते , नितीन तवले युवासेना उपतालुका अधिकारी, माजी उपसरपंच दत्ता मांडे , माजी सरपंच कविता कोंडीलकर, सुनंदा जमदाडे महिला आघाडी चौक, सरपंच चांगु चौधरी, माजी उपसरपंच सुभाष प्रबलकर , माजी शाखाप्रमुख राकेश कदम तसेच विभागातील प्रमुख कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

मनोहर भोईर सामाजिक संस्थेच्यावतीने लाॅकडाऊन कालात खालापुर तालुक्यातील ४४०० आदीवासी कुटूंबाना तर रोजंदारीवर काम करणाऱ्या ३०००कुटूंबाना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच पनवेल तालुक्यातील ३६०० आदीवासी कुटूंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.याचबरोबर उरण तालुक्यातील २२०० आदीवासी कुटूंब आणि गरजू व गोरगरिब ५२०० कुटुंबांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.मनोहर भोईर सामाजिक संस्थेच्या वतीने २१००० हजार कुटुंबांना धान्यासह किराणा सामान वाटपाचा संकल्प असून लाॅकडाऊन काळात कोणालाही उपाशी राहू देणार नाही, मी दुसऱ्या टप्प्यात स्वखर्चांने गरजू गोरगरीब कुटूंबांना मदत करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी बोलताना सांगितले.