• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

उद्योगपती नंदलाल ठक्कर यांच्याकडून इसांबे येथील अदिवासीवाडीत किराणा सामानाचे वाटप..


मोहोपाडा : गौतम सोनावणे

कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्याने देशभरासह राज्यात लॉक डाऊन परिस्थिती असताना इसांबे पंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांना उद्योगपती नंदलाल ठक्कर यांनी जीवनावश्यक सामानाचे वाटप करून मदतीचा हात दिला.

इसांबे हद्दीत व रसायनी पाताळगंगा विभागातही शासनाच्या या वाढिव लॉक डाऊन ला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु हातावर पोट भरणारे आदिवासी बांधव व मासेमारी करणाऱ्या आदिवासी समाजाचा उदर निर्वाह बंद असल्यामुळे रोजंदारी व मासेमारी करणारा तसेच दुसऱ्याच्या शेतात काम करून गुजराण करणाऱ्या कष्टकरी आदिवासी बांधवांवर घरातच बसण्याची वेळ आली होती.

रोजगार नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत व आदिवासी बांधव होते. याबाबत मा. सरपंच सुनील थोरवे यांनी मुलुंड येथील उद्योगपती नंदलाल ठक्कर यांना सांगितले. मा. सरपंच सुनील थोरवे यांच्या विनंतीला मान देऊन ठक्कर यांनी तात्काळ या गरजू गरीब आदिवासी व भोई समाजाला जीवनावश्यक सामान देऊन मदतीचा हात दिला. यावेळी मा. सरपंच सुनील थोरवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते जीवनावश्यक सामानाचे वाटप करण्यात आले.

इसांबे गावाच्या हद्दीतील वानीवली गाव, इसांबेवाडी, व लोहप्, आदिवासी वाडी येथील, 200 गोरगरीब आदिवासी व भोई कुटुंबाना घरोघरी जाऊन तांदूळ, तेल, डाळ असे वाटप केले. व आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी मा. सरपंच सुनील थोरवे, संदीप शिसवे, धनाजी पवार ,अनिल कनोजे , सतीश महाबदी व आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी इसांबे, लोहोप, वानीवली येथील ग्रामस्थ व आदिवासी बांधवांनी नंदलाल ठक्कर व मा. सरपंच सुनील थोरवे यांचे आभार मानले.