• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

आमदार महेश बालदी यांची रसायनी महावितरण अधिकाऱ्यांशी केली चर्चा


मोहोपाडा : गौतम सोनवणे

दिनांक 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळाने परिसरात सर्वत्र धुमाकूळ घातला होता. या निसर्ग चक्रीवादळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोहोपाडा मुख्य रस्त्यावर विद्युत खांबांवर मोठ मोठी झाडे पडली होती. त्यामुळे विद्युत वाहिनी कोसळून पडल्या होत्या. तर काही ठिकाणी परिसरातील लोकांच्या राहत्या घरांवरील पत्रे या चक्रीवादळामुळे उडून पडले होते. असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आमदार महेश बालदी यांनी ठिकठिकाणी भेट देऊन पाहणी केली. व एम.एस.ई.बी अधिकाऱ्यांची भेट घेऊन व वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी चर्चा केली. व लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत करा असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगत कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही आवश्यक ती मदत करू असे आमदार महेश बालदी यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी पनवेलचे एम.एस.ई.बी कार्यकारी अभियंता जगताप व कनिष्ठ अभियंता मोहोपाडा चे किशोर पाटील उपस्थित होते.

यावेळी रस्त्यावर व विद्युत पोलवर पडलेल्या झाडाच्या फांद्या दूर करण्यासाठी मनुष्यबळ लागणार असल्याने आमदार महेश बालदि यांनी तसे आदेश परिसरातील भाजप विभाग प्रमुख माजी सरपंच सचिन तांडेल व पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी झाडे कापण्यासाठी आत्याधुनिक कटिंग मशीन व मनुष्यबळ एम.एस.ई.बी ला देऊन सहकार्य केले. यावेळी वासंबे पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, खालापूर तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे, वासंबे शहराध्यक्ष संदेश जाधव, भा.ज.प युवा मोर्चा अध्यक्ष जयदत्त भोईर व व्यापारी संघटनेचे अमित शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.