• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

आमदार महेश बालदी यांच्यातर्फे रसायनीतील डॉक्टरांना पी.पी.ई किट चे वाटप..


मोहोपाडा : गौतम सोनावणे

उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नुकतीच रसायनी परिसराला भेट दिली असून यावेळी परिसरातील व्यापारी वर्ग व डॉक्टरांची त्यांनी भेट घेतली व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आव्हान केले.

रसायनी परिसरात गेल्या दोन महिन्यापासून एकही रुग्ण सापडला नव्हता परंतु सध्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ झाली असून दहावर गेली आहे. यामुळे आमदारांनी डॉक्टरांना आपली काळजी घेण्याचे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉक्टरांनीही आमदारांशी मनमोकळेपणाने चर्चा केली व योग्य त्या सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना आमदार महेश बालदी यांनी सांगितले की जे लोक ज्या कामानिमित्त बाहेर जात आहेत त्यांची नोंद करणे आवश्यक असून याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार आहे. शिवाय परिसरात कारखानदारी असल्यामुळे बाहेरील कामगार कारखान्यात कामावर येता कामा नये यासाठी कंपनीला पत्रव्यवहार करून सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सावळ्याचे मा. सरपंच अविनाश गाताडे, खालापूर तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे, वासांबे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष आकाश जुईकर, व्यापारी संघटनेचे अमित शाह, ओसवाल यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व डॉक्टर नागरिक उपस्थित होते.