• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

आमदार महेंद्र थोरवे यांची पेण बँकेला प्रशासक म्हणून नेमलेले आदेश रद्द करण्याची मागणी

कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांची पेण को.ऑफ.बँक लि. ला प्रशासक म्हणून नेमलेले आदेश रद्द करण्याची मागणी


रसायनी : प्रतिक चाळके

रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेचा महाघोटाळा उघड होऊन दहा वर्षे झाली असून पेण अर्बन बँकेने एकूण ७५८ कोटींचा घोटाळा केलेला आहे. या बँकेमध्ये गरीब, मध्यमवर्गीय, निवृत्त व ज्येष्ठ अश्या ठेवीदारांचे पैसे पेण अर्बन बँकेत अडकलेले आहेत. सदरच्या ठेवीदारांनी अनेक मोर्चे काढले असून त्यांना योग्य न्याय मिळाले नसल्याचे दिसून येत आहे.

कर्जत- खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करून पत्र सुद्धा देण्यात आले होते. आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे पैसे देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळून देण्याऐवजी पेण बँकेत घोटाळा करणाऱ्या, बँक बुडवणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या शासकीय अधिकारी ऑडिटर्स यांच्या बाबतीत हिताची भूमिका राबविताना दिसतात, असे आमदार महेंद्र थोरवे यांचे वक्तव्य आहे.

श्री. अनिल कवडे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे २४.०२.२०२० रोजीच्या आदेशानुसार प्रशासकीय कारणास्तव सदर प्रशासक मंडळाऐवजी प्रशासकाची नियुक्ती केली असल्याने सदरचा आदेश म्हणजे पेण अर्बन बँक ही लिक्विडेशनमध्ये काढणे होय. तसेच कर्जत, खालापूरसह रायगड जिल्ह्यातील पेण अर्बनच्या अनेक शाखांमध्ये गोरगरिब जनतेचे पैसे पेण अर्बन बँकेत अडकले असताना सुद्धा सहकार आयुक्त यांचा आदेश म्हणजे गोरगरीब जनतेची फसवणूक असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले.

कर्जत- खालापूरसह रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेतील ठेवीदारांची फसवणूक होऊ नये, तसेच ठेवीदारांची जी काही रक्कम आहे ती त्या ठेवीदारांना परत मिळावी. तसेच सहकार आयुक्त यांनी जो आदेश काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा. अशी मागणी कर्जत- खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पत्राद्वारे करण्यात आली.