• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन च्या माध्यमातून आदिवासी व गोरगरीब कुटुंबांना अन्न धान्य वाटपखालापूर : प्रसाद अटक

कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव असल्याने सर्व मोल मजुरी ची कामे बंद आहेत. तसेच गोरगरीब जनतेला प्रत्येक जण सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य करीत आहे. कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः पुढाकार घेत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन च्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील असणाऱ्या हाळखुर्द कातकरवाडी, हाळखुर्द बौद्धवाडा , नावंढे कातकरवाडी व जाबरुंग ठाकूरवाडी येथील आदिवासी बांधव यांना आमदार थोरवे यांनी स्वतः उपस्थित राहून अन्न धान्याचे वाटप केले या प्रसंगी

शिवसेना तालुकाप्रमुख संतोष विचारे, उपतालुकाप्रमुख संजय देशमुख, समन्वयक एकनाथ पिंगळे, प्रवक्ते सुरेश देशमुख, युवासेना जिल्हा चिटणीस प्रशांत खांडेकर, युवासेना तालुका अधिकारी महेश पाटील, विभागप्रमुख रोहिदास पिंगळे, हुसेन खान, माजी सरपंच अजिम मांडलेकर यांचेसह जाबरुंग - हाळखुर्द - नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव उपस्थित होते.

20 views0 comments