• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

आदिवासी सेवा संघाच्या प्रयत्नांनी जिल्हा बाहेरील गरिब, गरजूंना दैनंदिनी वस्तूंचे वाटप

आदिवासी सेवा संघाच्या प्रयत्नांनी जिल्हा बाहेरील गरिब, गरजूंना दैनंदिनी वस्तूंचा वाटप


पनवेलचे तहसीलदार श्री. सानप यांनी दिला मजूरांना दिलासा


पनवेल : प्रतिनिधी

कोरोना विषाणू प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून शासनाने जमावबंदी व संचारबंदी लागू करून सर्वञ लाॅकडाउन केले आहे. त्यामुळे जिल्हा बाहेरील नागरिक कामानिमित्ताने रायगड, पनवेल या ठिकाणी आल्याने त्यांना गावाकडे जाणे अवघड झाले. काम करून जीवन जगणा-या नागरिकांना उपासमारीची दिवस येवू लागलेत.

या संदर्भात आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांनी काही दिवसापूर्वी पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांच्याकडे संपर्क करून आदिवासी सेवा संघाच्या पञाद्वारे कळविण्यात आले तसेच पाठपुरावा देखील केला.

यावेळी तहसीलदार श्री. सानप यांनी तात्काळ बुलढाणा, जालना जिल्ह्यातील मजूरांना दैनंदिनी वस्तूंचा पूरवठा उपलब्ध करत आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांच्याकडे देवून जिल्हा बाहेरील मजूरांना दैनंदिनी वस्तूंचा वाटप करण्यात आले. या दैनंदिनी वस्तूमध्ये तांदूळ, तूरडाळ, साखर, आटा, मीठ या वस्तूंचा समावेश होतो.

जालना, बुलढाणा या जिल्ह्यातील मजूरांना दैनंदिनी वस्तूंचा वाटप केल्याने पनवेलचे तहसीलदार अमित सानप, आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष गणपत वारगडा यांचे या जिल्ह्या बाहेरील मजूरांकडून कौतुक केले जात आहे.