- हक्कासाठी आंदोलन
अष्टविनायक स्थानातील महड क्षेत्र सुने सुने.. हार-फुले, नारळ विक्रेते संकटात

चौक : अर्जुन कदम
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अष्टविनायक क्षेत्रापैकी खालापूर तालुक्यातील महड येथील हार-फुले,नारळ व पूजेसाठी साहित्य विकणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
श्री क्षेत्र अष्टविनायक पैकी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील महड या श्री वरदविनायकाच्या गावातील हार-फुले,नारळ व पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकांदारांवर उपासमारीची वेळ आली असून शासनाने ताबडतोब सहाय्य करावे अशी मागणी दुकानदार करीत आहेत.कोरोना या महामारीमुळे सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंदी केल्याने अष्टविनायक क्षेत्रातील महड हे देवस्थान धार्मिक विधी व दर्शनासाठी बंद केले आहे.
सुमारे ५५ दिवसांचा कालावधी झाला असून ऐंशी टक्के गावातील लोक नारळ, हार-फुले व पूजेचे साहित्य विकून आपली उपजीविका करतात,तर येथील गुरव समाज व ब्राम्हण लोक धार्मिक विधी बंद झाल्याने तेही आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत आहेत, लॉकडाउनलोड सुरू होण्याची वेळ व परीक्षा सम्पून सुट्ट्या सुरू होण्याची वेळ जवळपास एकच मुंबईआली. ,पुणे,नवीमुंबई येथील भाविकांना हे क्षेत्र जवळ असल्याने व जिल्ह्यातील,परिसरातील लोक हजारोंच्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी यायचे,त्यामुळे येथील व्यावसाईक यांची भरभराट होती.महिला बचतगट किंवा अन्य मार्गांनी कर्ज काढून लोक व्यवसाय करीत होते.व्यवसाय नसल्याने बचतगट व बँकेच्या हप्त्याची मोठी थकबाकी होत आहे,येथील महिला व्यावसाईक यांनी शासनाने दखल घेऊन अर्थसहाय्य करावे,लाईट बिल मध्ये सूट द्यावी अशी मागणी केली आहे.(श्री क्षेत्र महड येथील वरदविनायक मंदिरात संचारबंदीमुळे एकही भाविक नाही,छाया-अर्जुन कदम)