• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अविरत सेवा हेच आमचे कर्तव्य , गरजवंतांना अन्न देऊन थोरवे फाऊंडेशनचे एक पाऊल पुढे !


कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कोरोना विषाणू संसर्ग महामारीचा काळ खूपच भयानक असल्याचा सर्वांनीच अनुभवला . लॉकडाऊनमुळे कारागृहात राहिले सारखे अनेकांनी अनुभव घेतला, तर भुकेल्या पोटाला गोंजारून जे ताटात आले. ते अन्न परब्रम्ह समजून दोन घास खाऊन दिवस काढणारे देखील या कोरोनाच्या सुतक काळात गोरगरीब गरजू जीव अनेकांनी पाहिले . छत्रपतींच्या भूमीत दान करणे, हे या मातीत जन्मलेल्या दानवीरांचे कर्तव्यच असल्याने या कर्तव्याची जाण ठेवून गोरगरीब , गरजू, हातावर कमविणा-यां नागरिकांना या भूमीत उपाशी पोटी झोपी देणार नाही. हे उमजून कर्जत - खालापूर मतदार संघाचे प्रथम नागरिक व कर्तव्यदक्ष आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या थोरवे फाऊंडेशनच्या माध्यमातून अन्न धान्य वाटपाचे अविरत काम चालू आहे.

संपूर्ण कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात अन्न धान्य व रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे वाटप केल्यावर कर्जत शहरातील नगरसेवक संकेत भासे यांच्या प्रभाग नं. २ मधील संजय नगर विभागातील गोर गरीब व गरजू कुटुंबाना आमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशन च्या माध्यमातून अन्न धान्य वाटप करण्यात आले. भुकेलेल्यांना अन्न देणे , गरजवंतांना मदत करणे, अविरत सेवा हेच आमचे कर्तव्य हेच थोरवे फाऊंडेशनचे धोरण असल्याचे दिसत आहे.


10 views0 comments