• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी..

अवजड वाहन रस्त्याच्या बाजूला पलटी, वाहतुकीची कोंडी, वळण घेत असतांना झाला वहानाला अपघातात

पाताळगंगा : काशिनाथ जाधव

१५ जुलै : सावरोली - खारपाडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात कारखाने असून या ठिकाणी अवजड वाहनांची रेल चेल वाढली आहे.नावा शिवा येथून अवजड वहान एम.एच ४३ यू ६७७६ पाताळगंगा या परिसरात चालले होते.मात्र पौध येथे येताच त्यांनी वळण घेत असतांना वहान चालकांचे वहनावरील नियंत्रण सुटल्यास ते रस्त्याच्या बाजूला झुकले सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही.त्याच बरोबर वहानांचे सौम्य नुकसान झाले.मात्र हे वहान रस्त्याच्या बाजूला झुकल्यामुळे काही तासानंतर त्यांस बाहेर काढण्यात आले.मात्र हे वहान काढत असतांना मोठ्याप्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

                   पावसाळ्याच्या दिवसामध्ये अपघातांची समस्या गंभीर बनत असते.त्यातच रस्त्याची साईट पट्टी खचत असते.यामुळे पावसाळ्यात वहान चालवितांना काळजीपूर्वक चालवावी.ओव्हरटेक, ओव्हर लोड टाळा अश्या अनेक सुचना वहान चालकांस देत असतात.मात्र कमी वेळात जास्त माल कसा जाईल या विचारांतून वहान चालक अतिषय वेगाणे वहान चालवित असतात. यामुळे त्यांस नियोजित वेळेवर पोहचविण्यासाठी मदत होते.हेच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून वहान चालक अतिषय वेगाणे वहान चालवित असतात.परिणामी अपघातला सामोरे जावे लागत आहे. 

               पावसाळ्याच्या दिवसांमध्येच जमिन ओळसर झाल्यामुळे वहान घसरण्याचे प्रमाण वाढले यामुळे वहान चालवितांना स्वताच्या जिवा समवेत आपण दुसऱ्याचा जिव धोक्यात घालत आहे.रस्त्यावर प्रत्येकांनी वहान काळजी पुर्वक चालवा.असे विविध ठिकाणी बोर्ड लावले गेले आहे.मात्र त्यांचा कोणीही विचारात घेत नाही.या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण गेल्या वर्षी झाल्यामुळे रस्त्याची स्थिती उत्तम आहे.यामुळे वहनांचा वेग वाढला असून अपघाताचे प्रणाण ही वाढले जावू शकते.असे असले तरी सुद्धा या मार्गावर अपघात किंवा वहान पलटी झाल्यास वहातुकीची कोंडी निर्माण होत असते.

79 views0 comments
™© Copyright - dont copy this text™