• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आम .महेंद्रशेट थोरवे यांनी केली शासनाकडे भरपाईसाठी मागणी !कर्जत (भिसेगाव) : सुभाष सोनावणे

कर्जत - खालापूर तालुक्यात झालेल्या वातावरणातील बदलामुळे अतीगर्मीने दिनांक २९ एप्रिल रोजी अवकाळी वादळ वारा व सोसाट्याच्या झालेल्या पावसामुळे अनेकांच्या घरांचे , सामानांसहीत तसेच शेतीचे नुकसान झाले . झालेल्या नुकसानीची मदतरुपी भरपाई मिळावी , अशी मागणी आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे पत्रव्यवहार करून केली आहे .


कर्जत - खालापूर तालुक्यातील गोरगरीब जनता तसेच शेतकरी बांधव कोरोना विषाणू महामारीच्या संकटाला गेली दीड महिना घरात बसून मिळेल ते चटणी भाकर खाऊन झुंज देत असताना आलेल्या वादळ वारा व अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या अवकाळी पडलेल्या पावसामुळे दोन्ही तालुक्यातील अनेक शेतकरी व रहिवाश्यांचे घराचे, मालमत्तेचे नुकसान झाले , या आधीच कोरोनाचे संकट डोक्यावर असताना ही अचानक उद्भवलेली परिस्थिती पाहता खचलेल्या जनतेला झालेल्या नुकसानीतुन बाहेर काढण्यासाठी आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार श्री विजय वडेट्टीवर यांच्याकडे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी पत्रव्यवहार करून केली आहे .