• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अल्काईल अमाईन्स केमिकल लिमिटेड कंपनी कडून अन्नधान्य वाटप


अल्काईल अमाईन्स केमिकल लिमिटेड कंपनी कडून अन्नधान्य वाटप


रसायनी : प्रतिक चाळके

देशभरासह राज्यात कोरोना विषाणूच्या रोगाने थैमान घातले असून संचारबंदीला कैरे गावामधील मधील नागरिक हे उस्फुर्त प्रतिसात देत असून केंद्रसरकार आणि राज्यसरकार ने कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३ मे २०२० पर्यंत लॉक डाउन केल्याने अल्काईन अमाईन्स कंपनीने रसायनी येथील कैरे गावातील गरीब व गरजू नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, तुरडाळ, मुगडाळ, मीठ, तेल, साबण अश्या अत्यावश्यक वस्तू देण्यात आले असून एकूण १०० गरीब व गरजू नागरिकांनी या अत्यावश्यक सेवेचा लाभ घेतला.


जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना अल्काईन अमाईन्स केमिकल कंपनीचे अधिकारी रत्नाकर तावडे, श्री. बागुल, सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील, राजेंद्र दसवंते, सतिश पाटील, गणेश पाटील, यांनी वाटप प्रसंगी नागरिकांना मार्गदर्शन करत सांगितले की,

घराबाहेर न जाता घरात राहून प्रशासन ज्या प्रकारच्या सूचना करीत आहेत त्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा.

तसेच घरी रहा सुखी रहा असे सांगत नागरिकांना आवाहन करण्यात आले.

41 views0 comments

Recent Posts

See All

महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

🎤 *_सम्राट मराठी LIVE_* 🌐 ⏩ *ब्रेकिंग न्यूज* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ _*महाराष्ट्रात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय.*_ https://youtu.be/122_BuNRwTA 👆🏻 *बातमी पाहण्यासाठ