• Facebook
  • YouTube
  • Instagram
  • हक्कासाठी आंदोलन

अठरा महिन्याच्या बाळाने कोवीड-१९ विरोधातील युध्द जिंकले

अठरा महिन्याच्या बाळाने कोवीड-१९ विरोधातील युध्द जिंकले कोरोना बाधित बाळाच्या चाचण्या निगेटिव्ह सायंकाळी एमजीएम हॉस्पिटल म्हणून डिस्चार्ज मिळणार


पनवेल : प्रतिनिधी

मागील सोमवारी उरण तालुक्यातील जासई येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला. ते फक्त 18 महीने बाळ होते. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या लाहनग्याला अशाप्रकारे कोरोनाची बाधा झाल्याची घटना घडली होती. या महामारी रोगाला त्या चिमुकल्या ने हरवले आणि त्यातून ते बाळ पूर्णपणे बरे झाले आहे. थोड्याच वेळात या कोविड 19 विरोधातील लढाई जिंकलेल्या त्या बाळाचा डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी महापालिका आयुक्त गणेश देशमुख, प्रांत अधिकारी दत्तात्रय नवले यांच्यासह डॉक्टर्स परिचारिका यांनी टाळ्या वाजवून या बाळाचे अभिनंदन केले.